-
अभिनेत्री सई ताम्हणकर ही सध्याच्या घडीला मराठीतली आघाडीची अभिनेत्री आहे. सई इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. (सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इंस्टाग्राम अकाऊंट)
-
सई ताम्हणकर तिच्या इंस्टाग्रामवर कायमच फोटो पोस्ट करत असते.
-
सई ताम्हणकर इंस्टाग्रामवर कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते. सध्या ती नव्या बिझनेसमध्ये उतरली आहे. तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. त्याची चर्चा होते.
-
अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नुकतंच तिचा कपड्यांचा ब्रान्ड लॉन्च केला आहे. तिने याबाबतची खास पोस्ट शेअर केलीय. सईच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होते आहे.
-
सईच्या या टी- शर्टवर ‘घ्या भडंग!’, असा मजकूर लिहिलेला आहे. यावरूनच नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. भोरे भडंग… सांगलीचा. कसा दिला भडंग? अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. भडंग कसा प्लेट आहे? दोन पार्सल पाठव अशी कमेंट नेटकऱ्याने केली आहे. ज्याची चर्चा होते आहे.
-
‘मॅडम एस’ हा फक्त ब्रँड नाही तर माझ्याकडून माझ्या फॅन्स साठी प्रेक्षकांसाठी असलेलं हे एक रिटर्न गिफ्ट आहे.
-
सईने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो लाँच करण यासारखा दुसरा मुहूर्त नाही. म्हणून फॅन्ससाठी असलेलं हे खास रिटर्न गिफ्ट आहे, असं सईने तिच्या या नव्या ब्रँडविषयी म्हटलं आहे.
-
‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरिजमध्ये सुद्धा सई दिसणार आहे.
-
तुम्ही तुमचा आवडीचा टी- शर्ट खरेदी केला की नाही? असाही प्रश्न विचारत सईने हे फोटो पोस्ट केले आहेत.
