-
‘कल्की 2898 एडी’ चित्रपट थिएटरमध्ये कोट्यवधींची कमाई करत आहे. या चित्रपटाने जवळपास जगभरात ६०० कोटींच्या कलेक्शनचा टप्पा ओलांडला आहे.
-
कल्की चित्रापटापूर्वी, या वर्षी इतर अनेक दक्षिण भारतीय चित्रपट प्रदर्शित झाले आहेत जे कमी बजेटमध्ये बनले असून. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. जाणून घेऊया या चित्रपाटांबद्दल.
-
तेलुगू चित्रपट ‘हनु मान’ यावर्षी १२ जानेवारीला प्रदर्शित झाला होता. सुमारे ४० कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३५० कोटी रुपयांची कमाई केली. -
दक्षिण सिनेमातील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘मंजुम्मेल बॉईज’ बनवण्यासाठी फक्त २० कोटी रुपये खर्च झाले आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे २४२ कोटी रुपये कमवले. -
शेळीचे जीवन
‘द गोट लाइफ’ चित्रपटात अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे बजेट फक्त ३० कोटी रुपये होते आणि जगभरात या चित्रपटाने १५६ कोटी रुपयांची कमाई केली. -
११ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या ‘आवेशम’ चित्रपटात अभिनेता फहाद फाजिलचा उत्कृष्ट अभिनय पाहायला मिळाला. चित्रपटाचे बजेट ३० कोटी रुपये होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५४ कोटी रुपयांची कमाई केली. -
९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपट ‘प्रेमलू’चे बजेट फक्त ३ कोटी रुपये होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३६ कोटींची कमाई केली. -
मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टिल्लू स्क्वेअर’ या तेलगू भाषेतील चित्रपटाचे बजेट ३५ कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३६ कोटी रुपयांची कमाई केली होती. -
‘अरनमनई ४’ चित्रापटात तमन्ना भाटिया आणि राशि खन्ना मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे बजेट ३० कोटी रुपये होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जवळपास १०० कोटी रुपयांची कमाई केली.
![Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/New-Project-24-1.jpg?w=300&h=200&crop=1)
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली