-
मराठी अभिनेता प्रसाद ओक लवकरच बहुचर्चित ‘धर्मवीर – २’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे.
-
‘धर्मवीर – २’ या चित्रपटात प्रसाद ‘स्वर्गीय आनंद दिघे’ यांची भूमिका साकारणार आहे.
-
रविवारी (३० जून) रोजी या चित्रपटाचा पोस्टर लॉन्च सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला होता.
-
या सोहळ्यात प्रसादने हत्तीची प्रिंट असलेला शॉर्ट कुर्ता परिधान होता.
-
प्रसादच्या या फोटोंवर अभिनेत्री सई ताम्हणकरने ‘रुबाबदार!’ अशी कमेंट केली आहे.
-
प्रसादचा हा कुर्ता श्वेता शिंदेच्या ‘पोशाख’ या ब्रॅण्डचा आहे.
-
प्रसादच्या या शॉर्ट कुर्त्यामधील लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
‘धर्मवीर – २’ हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रसाद ओक/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : मराठमोळ्या अभिनेत्रीचं निसर्गाच्या सानिध्यात खास फोटोशूट)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”