-
अभिनेत्री भारती सिंग ही भारतातील लोकप्रिय विनोदी अभिनेत्री आहे. देशभरात तिचे लाखों फॅन आहे. मात्र या ठिकाणी पोहचण्यासाठी तिने कठोर मेहनत केली आहे.
-
3 जुलै रोजी कॉमेडी क्वीन भारती सिंह तिचा वाढदिवस साजरा केला. याच पार्श्वभूमीवर आज आपण भारती सिंगचा प्रवास आणि तिने सामना केलेल्या कठीण परिस्थितीविषयी जाणून घेऊया.
-
कॉमेडी क्वीन भारती सिंहने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता की, तिला अनेकदा रिकाम्या पोटी झोपावे लागले होते. गरिबीमुळे भारतीला तिचे शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागले होते.
-
मात्र, भारती सिंगने तिच्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे. भारती आज तिच्या विनोदबुद्धीने कोट्यवधी संपत्ती कमावली आहे. आता भारती लक्झरी लाइफ जगते आहे.
-
अमृतसर येथे लहानाची मोठी झालेली भारती आज कोट्यवधी संपत्तीची मालक आहे. काही रिपोर्ट्सनुसार भरतीची एकूण संपत्ती २५ कोटींच्या घरात आहे.
-
इतकंच नाही तर ती कोणत्याही कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी लाखों रुपये मानधन घेत असल्याचे सांगितले जाते.
-
२०१७ साली भारतीने हर्ष लिंबाचियाशी लग्न केले. लग्नाआधी ते बऱ्याच काळ एकमेकांना डेट करत होते. आता त्यांना एक मुलगा आहे.
-
भारती सिंगने ब्रूट इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यात केलेल्या संघर्षाविषयी खुलासा केला. भारतीने सांगितले की एकेकाळी गरिबी अशी होती की तिला कचरापेटीत फेकलेले सफरचंद उचलून खावेसे वाटायचे.
-
भारती पुढे म्हणाली, ‘जेव्हा लोक अर्धे सफरचंद खायचे आणि ते कचऱ्यात टाकायचे, तेव्हा मला ते पाप वाटायचे. ते सफरचंद कचरापेटीत टाकायचे तेव्हा मला वाटायचे की ते बाहेर काढून त्याचा अर्धा भाग कापून खाऊ.’
-
यानंतर भारती सिंगला कॉमेडी शो ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून प्रसिद्धी मिळाली. याशिवाय ती कॉमेडी नाइट्स विथ कपिलमध्येही दिसली होती. इतकंच नाही तर भारतीने अनेक रिॲलिटी शोही होस्ट केले आहेत.
-
सुरुवातीला लोक तिच्या लठ्ठपणाची खिल्ली उडवत. पण याच लठ्ठपणामुळे भारती सिंगने आपला वेगळा ठसा उमटवला आणि आता ती यशाच्या शिखरावर आहे.
-
Photos: एक वर्षाचा किराणा, दागिने, गॅस स्टोव्ह आणि…; अंबानी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात जोडप्यांवर भेटवस्तूंचा वर्षाव
![Natasa Shares Cryptic Video As Hardik Pandya Returns](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/hardik_natasha.jpg?w=300&h=200&crop=1)
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”