-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रिया बापटला ओळखलं जातं.
-
प्रिया सध्या तिच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकामुळे प्रचंड चर्चेत आहे.
-
लंडनमध्ये या नाटकाचे काही विशेष प्रयोग चालू आहेत.
-
याच निमित्ताने प्रिया सध्या लंडन दौऱ्यावर आहे.
-
यावेळी अभिनेत्रीने लंडनच्या रस्त्यावरील आयकॉनिक टेलिफोन बूथवर खास फोटोशूट केलं आहे.
-
प्रियाच्या या लूकवर बॉलीवूड अभिनेत्याने मजेशीर कमेंट केली आहे.
-
‘द फॅमिली मॅन’ फेम शारिब हाश्मीने “लंडनच्या रस्त्यावर झेब्रा दिसला” अशी मजेशीर कमेंट प्रियाच्या फोटोवर केली आहे.
-
यावर उत्तर देत प्रियाने देखील “हो कॅप्शन तुलाच विचारून दिलं पाहिजे होतं” असं लिहिलं आहे.
-
दरम्यान, प्रियाच्या या सुंदर लूकवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट इन्स्टाग्राम )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”