-
‘क्रिश’ या चित्रपटात हृतिक रोशनची बालपणीची भूमिका करणारा बालकलाकार मिकी आता खूप मोठा झाला आहे. इतकंच नाही तर त्याच्या प्रोफेशनल ट्रान्सफॉर्मेशनने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे.
-
क्रिशमध्ये हृतिकच्या एन्ट्री सीनमध्ये घोड्यासोबत पळणारा मिकी आता डोळ्यांचा सर्जन आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे.
-
या व्हिडीओमध्ये मिकीने म्हटले की रुग्ण त्याला नेहमी म्हणतात की त्यांनी त्याला कुठे तरी पाहिले आहे. यावेळी मिकीने आपल्या प्रवासाबद्दल लोकांना सांगितले.
-
डॉक्टर मिकीने त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिले, ‘तुम्ही मला आधी कुठे पाहिले आहे का? होय, नक्कीच पाहिले आहे.’
-
मिकीने सांगितले, ‘मला ज्युनिअर क्रिश बनण्याचा आणि दुपार टॅलेंटेड कास्टबरोबर काम करण्याची संधी मिळाली. माझा हा अनुभव खूपच मजेशीर होता.’
-
मिकीने आपल्या करिअरची सुरुवात ‘सिटकॉम’, ‘घरवाली उपरावली’ आणि ‘सनी’ (2000) मधून केली. ‘घरवाली बहरवाली’ आणि ‘सनी’नंतर मिकीने 200 हून अधिक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले.
-
‘बाल कलाकारपासून नेत्रचिकित्सक बनण्यापर्यंतचा माझा प्रवास खूपच आश्चर्यकारक आहे. या प्रवासात मला अनेक आश्चर्यकारक अनुभव आणि शिकवणूकही मिळाली.’
-
माझ्या अभिनयाच्या दिवसांतून मिळालेल्या धड्यांमुळे मला डोळ्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि या अनोख्या वाटेवरील प्रत्येक पावलाबद्दल मी कृतज्ञ आहे. आता मी तुमचा आय केअर सुपरहिरो होऊ शकतो.
-
डॉक्टर मिकीच्या पोस्टवर लोकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, ‘शक्तींचा योग्य वापर.’ दुसऱ्याने लिहिले, “कोई मिल गयामध्ये याच्या वडिलांचा चश्मा जादूने काढून टाकला होता आणि ज्युनिअर ऋतिक डोळ्यांचा डॉक्टर बनला.” आणखी एकाने लिहिले, “तुम्ही ‘कोई मिल गया’मध्येही ज्युनिअर रोहितचे पात्र साकारले होते?” यावर मिकीने उत्तर दिले, “हो, तो मीच होतो.”
-
बॉलीवूडमध्ये ठसा उमटवल्यानंतर, मिकी अभिनय क्षेत्रापासून दूर झाला आणि डोळ्यांचा सर्जन बनला. मिकीने एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये देखील सर्जन म्हणून काम केले आहे. आता तो तीन आय क्लिनिकचा मालक आहे.

११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य