-
मुकेश व नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी १२ जुलैला राधिका मर्चंटशी लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना जोरदार सुरुवात झाली आहे.
-
२ जुलैला सामूहिक विवाह सोहळा पार पडल्यानंतर ३ जुलैला ‘मामेरू’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘मामेरू’ ही एक गुजराती प्रथा आहे. त्यानुसार काल अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया येथे ‘मामेरू’ कार्यक्रम मोठ्या थाटामाटात झाला. या कार्यक्रमाला बॉलीवूड सेलिब्रिटींपासून अनेक दिग्गज मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली.
-
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर बॉयफ्रेंड शिखर पहाडियाबरोबर अनंत-राधिकाच्या ‘मामेरू’ कार्यक्रमाला पोहोचली होती.
-
अनंत-राधिकाच्या ‘मामेरू’ कार्यक्रमासाठी जान्हवी कपूरने खास लूक केला होता. गुलाबी आणि केशरी रंगाच्या लेहेंग्यात जान्हवी पाहायला मिळाली.
-
तसंच जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाने पांढऱ्या पायजम्यावर निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
-
अनंत-राधिकाच्या ‘मामेरू’ कार्यक्रमात जान्हवी व शिखर एकत्र पोहोचले होते. जान्हवीचा हातात हात घेऊन तिला सावरताना शिखर दिसला.
-
‘मामेरू’ कार्यक्रमातील जान्हवी व शिखरचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
-
याआधी अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यात जान्हवी शिखरला घास भरवताना दिसत होती. याचा देखील व्हिडीओ व्हायरल झाला होता.
-
सर्व फोटो सौजन्य – इन्स्टंट बॉलीवूड इन्स्टाग्राम आणि जान्हवी कपूर इन्स्टाग्राम

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…