-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. ३ जुलै रोजी अँटिलिया येथे मामेरू सोहळ्याद्वारे दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. अनंत अंबानी सारखेच राधिका मर्चंटही अतिशय श्रीमंत कुटुंबातून आहे. चला जाणून घेऊया राधिकाच्या कुटुंबाबाबत.
-
राधिका मर्चंटच्या वडिलांचे नाव वीरेन मर्चंट आहे. ते देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. वीरेन मर्चंट हे ‘एनकोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड’चे सीईओ आहेत. जी देशातील सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक आहे.
-
या कंपनीसोबतच वीरेन मर्चंट हे इतर अनेक कंपन्यांचे संचालक देखील आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘एनकोर’ कंपनी दरवर्षी सहा अब्ज पेक्षा जास्त औषधे बनवते.
-
वीरेन मर्चंट हे ‘एनकोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड’, ‘एनकोर बिझनेस सेंटर प्रायव्हेट लिमिटेड’, ‘एनकोर पॅलीफ्रेक प्रोडक्टस प्रायव्हेट लिमिटेड’, साई दर्शन बिझनेस सेंटर प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर अनेक कंपन्यांचे संचालकही आहेत.
-
वीरेन मर्चंट यांचा व्यवसाय केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशियामध्येही आहे. राधिका मर्चंटची आई शैला वीरेन मर्चंट देखील एक व्यावसायिक महिला आहे जी तिच्या पतीला त्याच्या व्यवसायात मदत करते.
-
एनकोर हेल्थकेअरची स्थापना २००२ मध्ये वीरेन आणि त्याची पत्नी शैला मर्चंट यांनी केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वीरेन मर्चंट यांची एकूण संपत्ती ७५० कोटी रुपये आहे.
-
वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांना राधिका मर्चंट आणि अंजली मर्चंट या दोन मुली आहेत. अंजली मर्चंटने बिझनेसमन आकाश मेहतासोबत लग्न केले आहे.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे मुंबईत १२ जुलै रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत.
![Natasa Shares Cryptic Video As Hardik Pandya Returns](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/hardik_natasha.jpg?w=300&h=200&crop=1)
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”