-
फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. या कलाकारांना येथून भरघोस उत्पन्नही मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का की इंस्टाग्रामवर लोक कोणत्या अभिनेत्रीला सर्वाधिक फॉलो करतात? (@Shraddha Kapoor/FB)
-
प्रियांका चोप्रा
फिल्म इंडस्ट्रीची देसी गर्ल प्रियांका चोप्रा केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्सच्या बाबतीत प्रियांका चोप्रा पहिल्या क्रमांकावर आहे. अभिनेत्रीचे ९१.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. (@Priyanka Chopra /FB) -
श्रद्धा कपूर
इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी दुसरी भारतीय अभिनेत्री श्रद्धा कपूर आहे. या अभिनेत्रीला इंस्टाग्रामवर 90.3 मिलियन लोक फॉलो करतात. (@Shraddha Kapoor/FB) -
आलिया भट्ट
आलिया भट्टला इंस्टाग्रामवर ८४.९ मिलियन लोक फॉलो करतात. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत आलिया भट्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे. (@Alia Bhatt/FB) -
कतरिना कैफ
इंस्टाग्रामवर कतरिना कैफचे ८० मिलियन फॉलोअर्स आहेत. (@Katrina Kaif/FB) -
दीपिका पदुकोण
या बाबतीत दीपिका पदुकोण पाचव्या स्थानावर आहे. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर ७९ मिलियन फॉलोअर्स आहेत. (@Deepika Padukone/FB) -
उर्वशी रौतेला
इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीत उर्वशी रौतेला सहाव्या स्थानावर आहे. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 73 मिलियन फॉलोअर्स आहेत. (@Urvashi Rautela/FB) -
जॅकलिन फर्नांडिस
जॅकलिन फर्नांडिसचे इन्स्टाग्रामवर ७० मिलियन फॉलोअर्स आहेत. (@Jacqueline Fernandez/FB) -
अनुष्का शर्मा
भारतात विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. त्याला २७० दशलक्ष लोक फॉलो करतात. त्याचबरोबर त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचे इंस्टाग्रामवर ६८ मिलियन फॉलोअर्स आहेत. (@Anushka Sharma/FB) हेही पाहा – PHOTOS : पंकजा मुंडेंच्या नावे तब्बल २७ कोटी रुपयांचं कर्ज तर एकूण ‘इतक्या’ संपत्तीच्…
![Natasa Shares Cryptic Video As Hardik Pandya Returns](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/hardik_natasha.jpg?w=300&h=200&crop=1)
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”