-
रतन टाटा हे देशातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत.
-
१९९१ ते २०१२ या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते आणि या काळात त्यांनी व्यवसाय क्षेत्रात अनेक चांगली कामं केलीत.
-
पण रतन टाटा यांनी कधी चित्रपटाची निर्मिती केली आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे.
-
त्यांची निर्मिती असलेला हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू हे कलाकार दिसले होते.
-
या चित्रपटाचे नाव ‘ऐतबार’ होते आणि हा चित्रपट टाटा इन्फोमीडिया लिमिटेडने बनवला होता. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी दिग्दर्शित केला होता.
-
हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट होता ज्यात जॉन अब्राहम एका प्रियकराच्या भूमिकेत दिसला होता जो बिपाशा बसूला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असतो.
-
चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी बिपाशा बसूच्या वडिलांची भूमिका साकारली होती, ज्यांनी तिला जॉनपासून वाचवले होते. १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फिअर’ या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित हा सिनेमा होता.
-
प्रत्येक वेळी नवनवे विक्रम प्रस्थापित करणारे रतन टाटा निर्माते म्हणून यशस्वी होऊ शकले नाहीत. ‘ऐतबार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.
-
९.५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात केवळ ४.२५ कोटी रुपये कमावले आणि जगभरात केवळ ७.९६ कोटी रुपये कमावले होते.
(फोटो: एक्सप्रेस आर्काइव्ह)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख