-
भारताचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. (Photo Source: Social Media)
-
५ जुलै म्हणजेच आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबरची भारतात एन्ट्री झाली आहे. (Photo Source: @viralbhayani/instagram)
-
जस्टिन बीबरबरोबरच या संगीत सोहळ्यात भारतीय रॅपर्सदेखील आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. या कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी जस्टिनने मोठी रक्कम आकारल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. (Photo Source: @justinbieber/instagram)
-
मुकेश अंबानी यांनी जस्टिन बीबरला १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ८३ कोटी रुपये मानधन दिलं आहे. जे मानधन जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना आणि गायिका केटी पेरीपेक्षा जास्त आहे. (Photo Source: @justinbieber/instagram)
-
अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये परफॉर्म करण्यासाठी मुकेश अंबानी यांनी रिहानाला ७४ कोटी रुपये मानधन दिलं होतं. तर केटी पेरीला तिच्या ४५ कोटी रुपये मानधन दिलं होतं. (Photo Source: PTI Photo)
-
जस्टिन बीबरबद्दल बोलायचं तर, तो जगातील सर्वात यशस्वी गायकांपैकी एक आहे. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्याने जगभरात नाव कमावलं. (Photo Source: @justinbieber/Instagram)
-
आलिशान जीवनशैली जगणाऱ्या जस्टिन बीबरची एकूण संपत्ती ३५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच २५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. संगीत क्षेत्राबरोबरच व्यवसायातूनही तो चांगली कमाई करतो. (Photo Source: @justinbieber/instagram)
-
जस्टिन बीबर त्याची पत्नी हेलीबरोबर बेव्हरली हिल्स, कॅलिफोर्निया येथे राहतो, ज्याची किंमत US $ २५.८ दशलक्ष म्हणजेच २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. (Photo Source: @justinbieber/instagram)
-
जस्टिन बीबरकडे लक्झरी कारचं कलेक्शन आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये Cadillac CTS-V Coupe, Fisker Karma, Range Rover, Ferrari F430, Lamborghini Aventador, Ferrari 458 Itali, Audi R8 यांसारख्या कारचा समावेश आहे. (Photo Source: @justinbieber/instagram)

अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा, अजित पवारांची दोन वाक्यात प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले…