-
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या आगामी ‘बॅड न्यूज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला आहे.
-
काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी चित्रपटातील ‘तौबा तौबा’ हे गाणे रिलीज केले आहे. यामध्ये विकी कौशलने त्याच्या किलर डान्स मूव्ह्सने सर्वांनाच थक्क केले आहे. आता सलमान खानने विकी कौशलच्या अप्रतिम डान्स परफॉर्मन्सचे कौतुक केले आहे.
-
नुकतंच विकीने काही BTS फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तो अतिशय हॉट दिसत आहे.
-
दरम्यान, आता सलमान खानने विकी कौशलच्या अप्रतिम डान्स परफॉर्मन्सचे कौतुक केले आहे.
-
सलमान खानने इन्स्टा स्टोरीवर ‘तौबा तौबा’ गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये विकी कौशल जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.
-
यासोबतच सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ग्रेट मूव्ह्स विकी, गाणे छान आहे. हार्दिक शुभेच्छा.’
-
सलमान खानकडून प्रशंसा मिळाल्यानंतर विकी कौशल खूश झाला असून त्यानंतर त्याने सलमानचे आभारही मानले.
-
विकी कौशलने इंस्टा स्टोरीवर लिहिले, ‘तुम्ही खूप गोड आहात सलमान सर. खूप खूप धन्यवाद. हे माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी खूप खास आहे.’
-
विकी कौशलने २०२१ मध्ये कतरिना कैफशी लग्न केले. कतरिना एकेकाळी सलमान खानची गर्लफ्रेंड होती. मात्र, दोघेही कधी त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलले नाहीत.
-
‘बॅड न्यूज’ चित्रपटातील ‘तौबा तौबा’ हे गाणे करण औजलाने संगीतबद्ध केले असून त्यानेच हे गाणे गायले आहे. गाण्याचे बोलही करण औजला यांनी लिहिले आहेत.
-
‘तौबा तौबा’ गाण्यात विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. विकी कौशल आणि तृप्ती डिमरी व्यतिरिक्त एमी विर्क देखील ‘बॅड न्यूज’ मध्ये दिसणार आहे.
-
हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे, जो करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊस धर्मा प्रोडक्शन अंतर्गत बनला आहे. हा चित्रपट 19 जुलै 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
![Thane railway station local train Rush video train ladies coach crowd](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/New-Project-5-3.jpg?w=300&h=200&crop=1)
एकीकडे पावसाचा कहर दुसरीकडे महिलांच्या किंकाळ्या अन् आरडाओरडा; ठाणे रेल्वे स्थानकात भयंकर गर्दीचा VIDEO व्हायरल