-
बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक, चित्रपट निर्माते इम्तियाज अली आणि त्यांची मुलगी इंडियन एक्सप्रेसच्या ‘एक्सप्रेसो’ या सीरीजमध्ये पुढील पाहुणे असणार आहेत.
-
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तापसी आणि इम्तियाज हैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलेसमध्ये पोहोचले तेव्हाची ही छायाचित्रे आहेत.
-
या ६० ते ९० मिनिटांच्या लाईव्ह इव्हेंटमध्ये, तापसी आणि इम्तियाज त्यांच्या कारकिर्दीबद्दल, त्यातील चढ-उतार आणि त्यांच्या आयुष्यातील अनुभवांबद्दल बोलताना दिसतील.
-
एक्सप्रेसोमध्ये प्रेक्षकांसाठी प्रश्नांचे एक खुले सत्र देखील असेल, ज्यामध्ये दोन्ही सेलिब्रिटी प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देताना दिसतील.
-
इंडियन एक्सप्रेसच्या यूट्यूब चॅनलवर आज संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांना थेट पाहता येणार आहे, नंतरही कधीही पाहता येईल.
-
तापसीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने गेल्या २ वर्षांत ७ चित्रपट केले आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा डंकी हा तिचा सर्वात मोठा चित्रपट होता. आता तिच्याकडे अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’ आणि नेटफ्लिक्सचा थ्रिलर ‘फिर आयी हसीन दिलरुबा’चा सिक्वेल आहे.
-
त्याच वेळी, इम्तियाज अलीने दिलजीत दोसांझ स्टारर अमर सिंग चमकीला या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केले आहे. नेटफ्लिक्सवर या चित्रपटाची प्रचंड प्रशंसा झाली. इम्तियाज अलीने तमाशा, रॉकस्टार, जब वी मेट आणि लव्ह आज कल यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र, त्याने अद्याप त्याच्या पुढील चित्रपटाची घोषणा केलेली नाही.
(फोटो स्रोत: सांखदीप बॅनर्जी/द इंडियन एक्सप्रेस)
(हेही वाचा- PHOTOS : नोएडाच्या लॉजिक्स मॉलमध्ये भीषण आग; धुराच्या प्रचंड लोटात अग्निशमन दलाने केल…)
![Saleel Kulkarni start new hotel at sinhagad road khau galli](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/Saleel-Kulkarni-2.jpg?w=300&h=200&crop=1)
सलील कुलकर्णींनी हॉटेल व्यवसायात ठेवलं पाऊल, आईच्या हस्ते केलं उद्घाटन, पाहा फोटो