-
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा ५ जुलैच्या रात्री मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला. संगीत समारंभासाठी राधिकाने ऑफ शोल्डर टॉपसह सोनेरी रंगाचा लेहेंगा निवडला होता. गोल्डन वर्क असलेल्या काळ्या सूटमध्ये अनंतही अप्रतिम दिसत होता. या भव्य सोहळ्यात बॉलीवूडच्या मोठ्या स्टार्सनी हजेरी लावल्याने हा कार्यक्रम आणखी खास बनला. या कार्यक्रमात कोणते स्टार्स उपस्थित होते ते जाणून घेऊया.
-
अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला अभिनेत्री विद्या बालन पतीसोबत पोहोचली होती. यावेळी तिने फ्लोरल लेहेंगा परिधान केला होता.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात अर्जुन कपूर त्याची बहीण अंशुला कपूरसोबत पोहोचला.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत समारंभात अभिनेत्री करिश्मा तन्ना पांढऱ्या रंगाच्या लेहेंगामध्ये पोहोचली होती.
-
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला उपस्थित होते. आदित्य रॉय कपूर आणि शाहीन भट्ट यांनी या कपलसोबत फोटो क्लिक केला.
-
अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला अभिनेत्री अमिषा पटेलही आली होती. या फंक्शनमध्ये तिने हिरव्या दागिन्यांसह सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
-
सोनाली बेंद्रे पती गोल्डी बहलसोबत राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या संगीत सोहळ्यात सहभागी झाली होती.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत कार्यक्रमात ‘नागिन’ फेम मौनी रॉयने बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीसह तिची फॅशन स्टाइलही दाखवली. यादरम्यान मौनीने चॉकलेट रंगाच्या साडीसोबत गोल्डन ब्लाउज घातला होता.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला जान्हवी कपूरनेही हजेरी लावली होती. यावेळी, अभिनेत्री मोरपंखी डिझाइनच्या सुंदर लेहेंग्यात दिसली.
-
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूरही या सोहळ्यात दिसली. यावेळी तिने ऑफ शोल्डर ब्लाउज आणि डायमंड ज्वेलरीसह गुलाबी रंगाची चमकदार साडी परिधान केली होती.
-
जान्हवी आणि खुशी व्यतिरिक्त बोनी कपूर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत कार्यक्रमात शहनाज गिल देखील दिसली होती. यावेळी तिने सिग्नेचर मस्क्युलर डिझाइनची गोल्डन साडी परिधान केली होती.
-
अनंत-राधिकाच्या संगीत समारंभात अभिनेत्री सारा अली खानही पोहोचली. ती सोनेरी रंगाच्या चमकदार फिश कट लेहेंग्यात दिसली.
-
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या संगीत सोहळ्याला सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानही उपस्थित होता.
-
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीही केशरी रंगाचा लेहेंगा नेसून या कार्यक्रमात पोहोचली. यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती.
-
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या संगीत सोहळ्याला सलमानची बहीण अर्पिता आणि मेव्हणा आयुष शर्माही उपस्थित होते.
-
रकुल प्रीत सिंह पती जॅकी भगनानीसोबत राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या संगीत सेरेमनीमध्ये पोहोचली होती.
-
या फंक्शनमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीही बहारदार दिसत होते. यादरम्यान, अभिनेत्याने काळा कुर्ता घातला होता तर कियारा पांढऱ्या स्ट्रॅपलेस ब्लाउजसह सिल्व्हर लेहेंग्यात नेहमीप्रमाणेच आकर्षक दिसत होती.
-
महाराष्ट्राचे फेवरेट कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी अतिशय क्युट स्टाईलमध्ये क्लिक केलेला फोटो पाहायला मिळाला.
-
वरुण धवन पत्नी नताशा दलालसोबत या कार्यक्रमाला उपस्थित होता.
-
बॉलीवूडवची धक धक गर्ल माधुरी दीक्षित देखील तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत सोनेरी रंगाच्या ट्रांसपेरेंट साडीत या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
-
अनन्या पांडेने तिच्या दागिन्यांशी जुळणारी चमकदार चांदीच्या रंगाची साडी नेसली होती. ती या ग्लॅमरस लूकमध्ये सुंदर दिसत होती.
-
या संगीत सोहळ्यात अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा लाल रंगाच्या टाइट फिटिंग फिश कट ड्रेसमध्ये दिसली.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात काजल अग्रवालही तिच्या पतीसोबत सहभागी झाली होती.
-
सान्या मल्होत्राने राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली.
-
‘चक दे इंडिया!’ या चित्रपटात अभिनय केलेल्या सागरिका घाटगेने तिचा पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानसोबत या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
अथिया शेट्टीने पती केएल राहुलसोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
‘जवान’ चित्रपटाचे दिग्दर्शक ऍटलीही पत्नीसोबत अनंत-राधिकाच्या संगीत कार्यक्रमाला पोहोचले होते. यादरम्यान ते मल्टी कलर पोशाखात ट्विनिंग करताना दिसले.
(Photos Source: Jansatta)
हेही वाचा – PHOTOS : भारतातील गडगंज श्रीमंत उद्योगपतींच्या यादीमध्ये मुकेश अंबानींचे तीन व्याही; …
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”