-
मुकेश व नीता अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. १२ जुलैला राधिका मर्चंट हिच्याशी लग्न करून अनंत अंबानी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. सध्या अनंत-राधिकाच्या लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू आहेत.
-
काल, ५ जुलैला संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्याला बॉलीवूड कलाकारांसह विविध क्षेत्रातील मंडळींनी खास हजेरी लावली होती. याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील लूकची चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
संगीत सोहळ्यात अनंत आणि राधिकाने प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसलाने तयार केले आउटफिट घातले होते.
-
अनंत अंबानीने निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. ज्यावर सोन्याच्या धाग्यांनी वर्क करण्यात आले होते, अशी माहिती डिझायनरने दिली.
-
राधिका मर्चंटने गुलाबी आणि पिस्ता रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. ज्यावर तिने नेकलेस, छोटे कानातले आणि मोकळे केस ठेवलं होते. राधिका या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
-
संगीत सोहळ्यातील राधिकाच्या लेहेंग्यावर क्रिस्टल्सचं वर्क करण्यात आलं आहे.
-
अनंत-राधिकाच्या या रॉयल लूकने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरने परफॉर्मन्स केला. माहितीनुसार, जस्टिन बीबरला या परफॉर्मन्ससाठी अंबानींनी ८४ कोटी रुपये मोजले आहेत.
-
जस्टिन बीबर व्यतिरिक्त बॉलीवूडच्या कलाकारांनी संगीत सोहळ्यात जबरदस्त डान्स केला. सलमान खानपासून ते रणवीर सिंहपर्यंत असे बरेच बॉलीवूड कलाकार थिरकताना पाहायला मिळाले. (सर्व फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?