-
महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (सर्व फोटो सौजन्य-प्रियदर्शनी इंदलकर, इंस्टाग्राम पेज)
-
प्रियदर्शनी इंदलकरने या फोटोंमध्ये एक खास ड्रेस परिधान केला आहे.
-
पूर्वी मुली परकर आणि पोलकं घालायच्या त्या पद्धतीचा हा खास ड्रेस आहे.
-
प्रियदर्शनीच्या या ड्रेसवर एका लाजाळू बाईचं चित्र आहे जे हाताने काढण्यात आलं आहे असं प्रियदर्शनीनेच म्हटलं आहे.
-
प्रियदर्शनीने या ड्रेससह केसांमध्ये एक फूलही माळलं आहे जे तिच्या सौंदर्यात भर घालतं आहे.
-
प्रियदर्शनीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
-
या खास ड्रेसमध्ये तू भारतीय बार्बी डॉल दिसते आहेस अशी कमेंट काही चाहत्यांनी केली आहे. तसंच प्रियदर्शनीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
-
प्रियदर्शनीचं Shini_da_priya हे इंस्टाग्राम अकाऊंट चांगलंच चर्चेत आहे. कारण या अकाऊंटवर ती खूप सक्रिय आहे.
-
प्रियदर्शनी सोशल मीडियावर अनेक फोटो पोस्ट करत असते. तिच्या फोटोंवर कमेंटही पडतात.
-
या ड्रेसमध्ये अगदी फुलराणी दिसते आहेस असंही काही चाहत्यांनी म्हटलं आहे.
-
काही दिवसांपूर्वी प्रियदर्शनीने तिचे निळ्या साडीतले फोटो पोस्ट केले होते. ज्यातही ती खूप सुंदर दिसत होती.
-
प्रियदर्शनीचा आणखी एक खास अंदाज, तिच्या या फोटोंवरही चाहते खुश झाले होते.
-
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रियदर्शनी घराघरांत पोहचली आहे. तिचं विनोदाचं टायमिंग अफाट आहे.
-
प्रियदर्शनीने फुलराणी सिनेमातही काम केलं आहे. या सिनेमात सुबोध भावेसह ती झळकली होती.
-
साडी असो, वेस्टर्न आऊटफिट असो की फ्रॉक प्रियदर्शनी सगळ्याच प्रकारच्या कपड्यांमध्ये सुंदर दिसते.

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक