-
बिग बॉस ओटीटी या लोकप्रिय रिॲलिटी शोमध्ये अलीकडेच हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शोचा स्पर्धक अरमान मलिकने विशाल पांडेला कानाखाली मारली आहे.
-
खरंतर, काही दिवसांपूर्वीच विशालने अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिकवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. तो म्हणाला होता की त्याला कृतिका मलिक आवडते.
-
अलीकडेच, शोची माजी स्पर्धक आणि अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक ‘वीकेंड का वार एपिसोड’मध्ये दिसली.
-
तिने कार्यक्रमात आल्यावर विशाल पांडेच्या त्या टिप्पणीवर आक्षेप घेतला.
-
वादग्रस्त वक्तव्यानंतर अरमान मलिकने विशालला कानाखाली मारली आहे. या भांडणाची सुरुवात अरमान मलिक आणि विशाल यांच्या वादातून झाली, मात्र नंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले.
-
यानंतर अरमान मिलकला बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, कोण आहे विशाल पांडे? आणि त्याची संपत्ती किती?
-
विशाल पांडे एक अभिनेता आणि सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सर आहे. इंस्टाग्रामवर विशालचे ९.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
विशाल पांडेला TikTok मधून लोकप्रियता मिळाली. यामध्ये तो समिक्षा सूद आणि भाविन भानुशाली यांच्यासह रील बनवत असे.
-
यानंतर या तिघांची ओळख सोशल मीडियावर ‘तीन तिगडा’ अशी झाली. विशालने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे.
-
विशाल पांडेने अनुराग कश्यप आणि आमिर खान यांच्यासह अनेक मोठ्या सेलिब्रिटींसोबत काम केले आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विशाल पांडेची एकूण संपत्ती पाच ते दहा कोटी रुपये इतकी आहे.
-
त्याचबरोबर विशाल दर महिन्याला दहा ते वीस लाख रुपये कमावतो. त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे तीन कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. (All Photos: Vishal Pandey/Instagram)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश