-
‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा तिसरा सीझन OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. ( फोटो – स्क्रीनशॉट)
-
या मालिकेतील कालीन भैया आणि गुड्डू पंडित यांच्याशिवाय कवी रहीमचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. ( फोटो – स्क्रीनशॉट)
-
‘मिर्झापूर ३’ मध्ये रहीम नावाचे हे पात्र एक कवी आहे जो आपल्या कवितांमुळे अडचणीत सापडतो.
-
या मालिकेत रहीमने नेताजींना शिवीगाळ असलेली कविता ऐकवली आणि लोकांचे मनोरंजन केले.
-
ही व्यक्तिरेखा मालिकेच्या फक्त तीन भागांमध्ये दिसत असली तरी, त्यामुळे प्रेक्षकांचं खूप मनोरंजन झालं आहे.
-
आपल्याला हसवण्यासोबतच मिर्झापूरची कथा बदलण्यातही या पात्राचा मोठा वाटा आहे.
-
अशा परिस्थितीत कवी रहीमची भूमिका साकारणारा हा अभिनेता कोण आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे.
-
कवी रहीमची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव पल्लव सिंह आहे.
-
या सीरिजमध्ये त्याने उत्कृष्ट अभिनय केला असून, त्याचे खूप कौतुकही होत आहे.
-
पल्लवने ‘मिर्झापूर ३’ पूर्वीही अनेक सीरिजमध्ये काम केलं आहे. सीरिजमधील त्याचा स्क्रीन टाईम फार मोठा नसला तरी तो जोरदार आहे.
-
‘मिर्झापूर ३’पूर्वी त्याने ‘माई’ आणि ‘ताज: डिवाइडेड बाय ब्लड’मध्ये काम केले होते.
-
पल्लव हा थिएटर आर्टिस्ट आहे.
-
त्याच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार, त्याने सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटीतून इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आणि नंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतले.
-
पल्लव सिंहने अनेक नाटकंही लिहिली आहेत.
-
(सर्व फोटो – पल्लव सिंह इन्स्टाग्राम)

३०० कोटी तुझ्यामुळे जमले नाहीत…; मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव ट्रोलिंगवर म्हणाला, “मी ज्या झोपडपट्टीतून…”