-
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी १२ जुलै २०२४ रोजी राधिका मर्चंटशी लग्न करणार आहे. मुंबईत सध्या लग्नापूर्वीचे सोहळे सुरू आहेत.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची गृह शांती पूजा ७ जुलै रोजी झाली. गायिका निकिता वाघेलाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या गृह शांती आणि मंडप मुहूर्ताचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
दरम्यान, अनंतने इव्हेंटसाठी गोल्डन जॅकेटसह लाल कुर्ता परिधान केला होता. तर राधिकाने सोनेरी काठांची पांढरी साडी नेसली होती.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्यासाठी खास म्युझिक नाईट ५ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. सलमान खान, रणवीर सिंग, आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, अर्जुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, करण जोहर आणि इतरांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या संगीत नाईटला उपस्थित होते.
-
या कार्यक्रमात पॉप गायक जस्टिन बीबरने परफॉर्म केलं.
-
अनंत आणि राधिका यांचा शुभ विवाह १२ जुलै रोजी जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई येथे होणार आहे. त्यानंतर १४ जुलैला लग्नाचे रिसेप्शन होणार आहे.

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन