-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. १२ जुलैला दोघं लग्नबंधनात अडकणार असून अवघे काही दिवस या लग्नाला बाकी राहिले आहेत. अशातच लग्नाआधीच्या कार्यक्रमांमुळे अंबानी कुटुंबातील महिला खूप चर्चेत आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे ईशा अंबानीची सासूबाई; आज आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊयात.
-
स्वाती पिरामल असं ईशा अंबानीच्या सासूबाईंचं नावं आहे. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधून त्यांचं शिक्षण झालं असून मुंबईतून त्यांनी एमबीबीएसची पदवी प्राप्त केली आहे.
-
ईशाच्या सासूबाई पेशाने वैज्ञानिक आणि व्यावसायिका आहे. त्यांनी विज्ञान, फार्मास्युटिकल्स, आर्थिक सेवा आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलं आहे.
-
स्वाती पिरामल यांनी पंतप्रधानांसाठी व्यापार परिषद आणि वैज्ञानिक सल्लागार परिषदेच्या सदस्याची जबाबदारी सांभाळली होती. एवढंच नव्हे २०१२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
-
ईशाच्या सासूबाई या हेल्थकेअर इनोव्हेशनमध्ये सक्रिय असून पती अजय पिरामल यांच्यासह कौटुंबिक व्यवसाय देखील सांभाळतात. त्या पिरामल ग्रुपच्या व्हाइस चेअरपर्सन आहेत.
-
हार्वर्ड बोर्ड ऑफ ओवर्सच्या स्वाती सदस्य होत्या. तसंच त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि पब्लिक हेल्थ येथील डीनच्या सल्लागार पदावरही काम केलं आहे.
-
अंबानींच्या व्याही असणाऱ्या स्वाती पिरामल यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याबरोबरही काम केलं आहे. त्यांनी २०१० ते २०१४ दरम्यान वैज्ञानिक सल्लागार परिषद म्हणून काम केलं होतं. त्या माजी पंतप्रधानांसाठी व्यापार परिषदेच्या सदस्या देखील होत्या.
-
१९७६ साली स्वाती यांनी अजय पिरामल यांच्याशी लग्न केलं होतं. दोघांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलाचे नाव आनंद असून मुलीचे नाव नंदिनी आहे.
-
आनंद हे मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचे जावई आहेत. २०१८ मध्ये ईशा अंबानी व आनंद यांचं लग्न झालं होतं. त्यांनाही दोन जुळी मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी आहे. (सर्व फोटो – जनसत्ता आणि सोशल मीडिया)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ