-
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही तिच्या इंस्टाग्रम पोस्टमुळे अनेकदा चर्चेत येते. आता ती पुन्हा खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (सर्व फोटो सौजन्य-इंस्टाग्राम, प्रियदर्शनी इंदलकर)
-
प्रियदर्शनी इंदलकरने आता तिचे काळ्या ड्रेसमधले काही फोटो पोस्ट केले आहेत. यात तिचा अंदाज एकदम खास दिसतो आहे.
-
खणाचा काळा ड्रेस, हातात फूल, डोळ्यांवर गॉगल असा प्रियदर्शनी इंदलकरचा अंदाज आहे, तिला हा ड्रेस एकदम खुलून दिसतो आहे.
-
या फोटोंमध्ये प्रियदर्शनीचं सौंदर्य खुलून आलं आहे. तसंच तिचं स्मितहास्य पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
-
प्रियदर्शनी इंदलकरच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
-
तू गोड परी आहेस, तुझ्यातला गोडवा वाढतच चालला आहे असं एका चाहत्याने म्हटलं आहे. पण अशातच एका चाहत्याची भन्नाट कमेंट आली आहे जी चर्चेत आहे.
-
“बोंबला आजीच्या शिव्या खा आता, किती साड्या फाडून कपडे शिवलेस ही तिसरी साडी आहे.” अशी कमेंट तिच्या एका चाहत्याने केली आहे. ज्याची चर्चा रंगली आहे.
-
प्रियदर्शनी इंदलकर या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे ती चांगलीच चर्चेत आली. तसंच तिने फुलराणी या सिनेमातही काम केलं आहे.
-
साडीपासून शिवण्यात आलेल्या या ड्रेसवर खास नक्षीकाम करण्यात आलं आहे. याआधीही तिने अशाच प्रकारच्या एका ड्रेसमधले फोटो पोस्ट केले होते.
-
प्रियदर्शनी इंदलकरच्या फोटोंची कायमच चर्चा होते त्याचप्रमाणे या फोटोंचीही चर्चा रंगली आहे.
-
या खास ड्रेसमध्ये तू भारतीय बार्बी डॉल दिसते आहेस अशी कमेंट काही चाहत्यांनी केली आहे. तसंच प्रियदर्शनीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
-
प्रियदर्शनीच्या या ड्रेसवर एका लाजाळू बाईचं चित्र आहे जे हाताने काढण्यात आलं आहे असं प्रियदर्शनीनेच म्हटलं आहे.
-
प्रियदर्शनीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
-
प्रियदर्शनीने फुलराणी सिनेमातही काम केलं आहे. या सिनेमात सुबोध भावेसह ती झळकली होती.
-
साडी असो, वेस्टर्न आऊटफिट असो की फ्रॉक प्रियदर्शनी सगळ्याच प्रकारच्या कपड्यांमध्ये सुंदर दिसते.

“कुठल्या जगात जगताय…”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक चक्रावले; नव्या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस