-
बॉलीवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा २३ जून रोजी लग्नबंधनात अडकली. सोनाक्षी आणि झहीर इक्बाल गेली सात वर्ष एकमेकांना डेट करत होते.
-
सोनाक्षी सिन्हाचे लग्न होऊन बराच कालावधी उलटला असला तरीही ती अजूनही सोशल मीडियावर तिच्या लग्नातील काही क्यूट क्षण शेअर करत आहे.
-
नुकतंच सोनाक्षीने सोशल मीडियावर तिच्या लग्नाच्या दिवसाचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. या प्रत्येक फोटोची आठवण तिने कॅप्शनमध्ये लिहिली आहे.
-
पहिल्याच फोटोमध्ये सोनाक्षीचा पती झहीरने शाहरुख खानची सिग्नेचर पोज दिली आहे.
-
या जोडप्याला वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी बॉलीवूडच्या किंग खानने खास व्हॉइस मेसेज पाठवला होता. ही व्हॉइस नोट ऐकून सोनाक्षी व तिचा पती दोघंही भारावून गेले होते.
-
या फोटोबाबत सोनाक्षीने म्हटलं आहे, “वधू आधी तयार झाली असल्याने ती वराची प्रशंसा करण्यासाठी पोहोचली.”
-
या फोटोसाठी कॅप्शन लिहीत सोनाक्षी म्हणाली, “तुम्ही कधी वराच्याच्या आधी तयार झालेली वधू पाहिली आहे का? नाही ना? बरं, इथे पाहा.”
-
इतकंच नाही तर सोनाक्षीला स्वतः ला भांगेत कुंकू लावून नववधूच्या रूपात पाहून अश्रू अनावर झाले.
-
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने लग्नानंतर त्यांच्या बांधकाम हॉट असलेल्या घरात फेरफटका मारला.
-
घरच्या बाल्कनीमध्ये उभं राहून ते दोघे त्याच्या उज्ज्वल आणि आनंदी भविष्याचे स्वप्न पाहत होते. (फोटो : सोनाक्षी सिन्हा : instagram)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”