-
चारू असोपा आणि राजीव सेन यांचे लग्न आणि घटस्फोट खूप चर्चेत राहिले.
-
२०१९ मध्ये दोघांनी लग्न केले आणि त्यानंतर लगेचच त्यांच्यात मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या. २०२२ पासून त्यांच्या विभक्त झाल्याची बातमी आली आणि अखेर २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
-
विभक्त झाल्यानंतरही राजीव त्यांची मुलगी जियानासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. जियाना तिची आई चारूसोबत राहते आणि राजीव त्या दोघांना भेटत राहतो.
-
चारूपासून घटस्फोट घेतल्यानंतर राजीव म्हणाला होता की दोघेही वेगळे झाले असले तरी ते पुन्हा एकत्र येऊ शकतात. कदाचित तो चारूशी पुन्हा लग्न करेल असंही त्याने म्हटलं होतं.
-
आता दोघं पुन्हा एकत्र दिसत आहेत. नुकतेच दोघे दुबईत फिरताना दिसले.
-
ही एक फॅमिली ट्रिप होती, ज्यात राजीव, चारू सोबत जियाना आणि राजीवची आई देखील होती.
-
सुष्मिता सेनही एका आऊटिंगमध्ये यांच्याबरोबर दिसली होती.
-
राजीव त्याच्या व्लॉगमध्ये चारू आणि मुलीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. यासोबतच तो फोटोही शेअर करत आहे.
-
यानंतर, दोघेही पुन्हा एकत्र येऊन लवकरच ते चाहत्यांना गुड न्यूज देऊ शकतात, अशा चर्चा होत आहेत.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”