-
लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी 3’मध्ये शोचा स्पर्धक अरमान मलिकने विशाल पांडेला कानशिलात मारली. तेव्हापासून तो सतत चर्चेत राहिला. यूट्यूबर अरमान मलिक, ज्याला दोन बायका आहेत, सध्या बिग बॉस ओटीटीमध्ये धमाल करत आहे.
-
शोमध्ये सुरुवातीला तो त्याच्या दोन्ही पत्नींसह पोहोचला होता, पण अवघ्या एका आठवड्यानंतर त्याची पहिली पत्नी पायल मलिकला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. पण तुम्हाला माहित आहे का अरमान मलिकचे खरे नाव काय आहे?
-
15 डिसेंबर 1989 रोजी राजस्थानमधील अजमेर येथे जन्मलेल्या अरमानने मुंबईतून शिक्षण घेतले कारण त्याचे वडील मुंबईत काम करत होते. अरमानचे खरे नाव संदीप वर्मा आहे.
-
अरमान मलिकने स्वतः सांगितले की, दिल्लीत आल्यावर त्याने नाव बदलले होते. दिल्लीतील सर्व गोष्टी पाहून पाहून त्याला कमालीचं आश्चर्य वाटलं. त्याला त्याचं पूर्वीच नाव संदीप खूपच हलकं वाटायला लागल्याने त्याने त्याचे नाव बदलून अरमान ठेवले.
-
अरमान जाट कुटुंबातील आहे. त्याने कोणताही धर्म बदललेला नाही आणि तो मुस्लिमही नाही. एका मुलाखतीत त्याने स्वतः याचा खुलासा केला होता.
-
अरमान मलिक पूर्वी बँकेत काम करायचा. याचदरम्यान त्याची पायलशी ओळख झाली. 2011 मध्ये त्याने पायलसोबत कोर्ट मॅरेज केले होते.
-
त्यानंतर काही वर्षांनी अरमानचे मन पायलची बेस्ट फ्रेंड कृतिकावर जडले आणि दोघांनी पायलला न सांगता 2018 मध्ये दुसरे लग्न केले.
(Photos Source: @armaan__malik9/instagram)
(हेही वाचा: Anant-Radhika Wedding: पाहा अनंत-राधिकाच्या मेहेंदी सोहळ्यातील बॉलीवूड स्टार्सचे ग्लॅ…)
![Indian Super Mom](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Indian-Super-Mom.jpg?w=300&h=200&crop=1)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास