-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बॉलीवूड स्टार्सचा मेळा जमणारच आहे पण त्याचबरोबर त्यांच्या लग्नाला देशातील अनेक मुख्यमंत्री आणि दिग्गज नेतेही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मुकेश अंबानी यांनी या विवाह सोहळ्यासाठी अनेक मोठ्या परदेशी पाहुण्यांनाही आमंत्रित केले आहे. (ANI)
-
या परदेशी पाहुण्यांमध्ये एक अभिनेत्री अशीही आहे जी खूपच श्रीमंत आहे. या अभिनेत्रीची एकूण संपत्ती जाणून तुम्हालाही धक्का बसेल. या अभिनेत्रीची एकूण संपत्ती शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. पण त्याआधी जाणून घेऊया अनंत आणि राधिकाच्या लग्नात कोणते परदेशी पाहुणे हजर असणार आहेत. (ANI)
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि बोरिस जॉन्सन, इटलीचे माजी पंतप्रधान मॅटिओ रेन्झी आणि जॉन केरी तसेच अनेक आंतरराष्ट्रीय राजकारणी उपस्थित राहणार आहेत. (ANI)
-
परदेशी पाहुण्यांच्या यादीत मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद, टांझानियाचे अध्यक्ष सामिया सुलुहू हसन, ऑस्ट्रियाचे माजी पंतप्रधान सेबॅस्टियन कुर्झ, कॅनडाचे माजी पंतप्रधान हार्पर आणि स्वीडनचे माजी पंतप्रधान कार्ल बिल्डट यांचाही समावेश आहे. (ANI)
-
किम आणि ख्लोए कार्दशियन या बहिणीही लग्नाला उपस्थित राहणार आहेत. त्याच वेळी, पॉडकास्टर आणि लाइफ कोच जय शेट्टी, कुस्तीपटू आणि अभिनेता जॉन सीना, डेस्पॅसिटो गायक लुईस रॉड्रिग्ज उर्फ लुईस फोन्सी आणि Calm Down song फेम रेमा देखील लग्नाला उपस्थित राहणार आहेत. (@Kim Kardashian/FB)
-
आपण ज्या श्रीमंत परदेशी अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी कोणी नसून किम कार्दशियन आहे. किम कार्दशियन तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते, ती एक प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही स्टार आणि अभिनेत्री तसेच एक बिझनेसवुमन आहे. (@Kim Kardashian/FB)
-
किम कार्दशियनच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की ती इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी जगातील ८ वी व्यक्ती आहे. तिला ३६१ मिलियन लोक फॉलो करतात. (@Kim Kardashian/FB)
-
किम कार्दशियनची एकूण संपत्ती १४ हजार २०६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. किम ही अमेरिकेतील सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही स्टार आहे. (@Kim Kardashian/FB) हेही वाचा- PHOTOS : सीएम योगी, चंद्राबाबू नायडूंपासून ते ममता बॅनर्जीपर्यंत ‘हे’ पाहुणे अनंत-राध…
Entertainment News Live Updates: इस्लाम स्वीकारणारा लोकप्रिय अभिनेता पहलगाम हल्ल्याबद्दल म्हणाला, “कोणताही धर्म…”