-
आज ‘देवदास’ (Devdas) या हिंदी चित्रपटाला २२ वर्ष पूर्ण झाली आहेत.
-
२००२ साली प्रदर्शित झालेला, हा संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित चित्रपट टाइमलेस प्रेमकथेमुळे आज ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
-
शाहरुख खान (Shah Rukh Khan), ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) अभिनीत, देवदास त्याच्या जबरदस्त व्हिज्युअल्स, परफॉर्मन्स व उत्तम संगीतासाठी कौतुकास्पद आहे.
-
७.५/१०च्या IMDb रेटिंगसह, देवदास हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट चित्रपट आहे.
-
या खास प्रसंगी, भन्साळी प्रोडक्शन्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलने चित्रपटाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
-
चुन्नी बाबूची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जॅकी श्रॉफने (Jackie Shroff) #22YearsOfDevdas हा हॅशटॅग वापरून चित्रपटातील फोटो आठवणी शेअर केल्या आहेत.
-
हिंदीत बनलेला हा तिसरा ‘देवदास’ आहे. प्रथम के.एल. सैगल (१९३६) आणि नंतर दिलीप कुमार (१९५५) यांच्याबरोबर करण्यात आला आहे.
-
‘काहे छेड मोहे’ (Kaahe Chhed Mohe) या गाण्यात माधुरी दीक्षितने परिधान केलेल्या पोशाखाचे वजन ३० किलो होते.
-
माधुरीला डान्स कोरिओग्राफीमध्ये खूप अडचणी आल्या, पण तिने ते यशस्वीपणे पूर्ण केले.
-
‘देवदास’ हा पहिला व्यावसायिक बॉलिवूड चित्रपट आहे ज्याला कान्सचे आमंत्रण मिळाले आहे.
-
श्रेया घोषालने तिच्या गाण्याच्या कारकिर्दीतील पहिले बॉलिवूड गाणे ‘बैरी पिया’ (Bairi Piya) हे १६ वर्षांची असताना रेकॉर्ड केले होते.
-
श्रेयाने संपूर्ण गाणे एका टेकमध्ये रेकॉर्ड केले, ते रेकॉर्ड केले जात आहे हे देखील कळत नाही.
-
‘डोला रे’ (Dola Re Dola) गाण्याच्या शूटिंगच्या वेळी ऐश्वर्या राय बच्चनच्या कानात जड झुमल्यांमुळे रक्तस्त्राव होत होता, पण तिने तिच्या अभिनयाच्या आड येऊ दिले नाही.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य