-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.
-
अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला जिनिलीयाने पती रितेश देशमुखसह हजेरी लावली आहे.
-
जिनिलीयाने या भव्य लग्नसोहळ्यासाठी खास पारंपारिक लूक केला आहे.
-
‘re- ceremonial’ या ब्रॅंडची ऑफ व्हाईट रंगाची साडी अभिनेत्रीने नेसली आहे.
-
भरजरी सोनेरी रंगाचं ब्लाऊज, त्यावर मॅचिंग शाल असा लूक अभिनेत्रीने केला आहे.
-
कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, भरगच्च हार, पारंपारिक कानातले, हातात रंगीबेरंगी बांगड्या असा श्रृंगार जिनिलीयाने केला आहे.
-
देशमुख कुटुंबाची ही मराठमोळी सून अगदी सुरेख दिसतेय.
-
“संस्कार हा असा दागिना आहे जो वेगळा परिधान करावा लागत नाही पण दिसतो” असं कॅप्शन जिनिलीयाने या फोटोंना दिलं आहे.
-
रितेश देशमुखने या लग्नासाठी धोतर, कुर्ता आणि जॅकेट परिधान केलं आहे. (All Photos- geneliad/Instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”