बॉलीवूड आणि क्रिकेट हे एक जुनं नातं असल्या सारख आहे. अनेक बॉलीवूड अभिनेत्री क्रिकेटर्ससोबत लग्न बंधनात अडकल्या आहेत. जाणून घेऊया यासंबंधित बॉलीवूडमधील एक खास किस्सा. ९० च्या दशकातील एका बॉलीवूड अभिनेत्रीने एकदा भारतीय क्रिकेट संघातील एका स्टार क्रिकेटपटूवर प्रेम असल्याची कबुली दिली होती. बॉलीवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यावर प्रेम असल्याची कबुली दिली होते.
अभनेत्री १९९२ च्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, “मी सुनील गावस्करसाठी वेडी आहे.” माधुरी माजी क्रिकेटपटूच्या चाहत्यांनीपैकी एक आहे. या मुलाखतीच्या वेळी माधुरी दीक्षित फक्त २५ वर्षांची होती, तर माजी क्रिकेटर ४३ वर्षांचे होती.
सुनील गावस्कर हे भारतीय क्रिकेट संघातील सर्वोत्तम सलामीवीर म्हणून ओळखले जातात.
ते १९८३ च्या भारतीय क्रिकेट संघाचा भाग होते, ज्याने कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली देशाला पहिला विश्वचषक जिंकून दिला.
‘या’ शुभ मुहूर्तावर सुरू होणार राधिका अनंत यांचा लग्न सोहळा, जाणून घ्या कसे आहे कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक…