-
सुंदर सी दिग्दर्शित ‘अरनमानाई ४’ या चित्रपटात तमन्ना भाटिया शेवटची दिसली होती. ३ मे २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात १०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला.
-
हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या तमिळ चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने तमन्ना भाटियाच्या कारकिर्दीला चालना दिली आहे.
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडच्या सर्व स्टार्सनी हजेरी लावली. तमन्ना भाटियाने १४ जुलै रोजी रिसेप्शनसाठी केलेल्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
या पेहरावात ती अतिशय सुंदर दिसत होती. या लेहेंग्यातील मनमोहक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
तमन्ना भाटिया ब्लॅक आणि गोल्ड लेहेंग्यात खूपच हॉट दिसत होती. तिच्या लेहेंग्यावर सोनेरी जरीचे बारीक काम करण्यात आले होते.
-
यावेळी तमन्नाने लेहेंग्यासह डीपनेक ब्लाऊज घातले होते. याचबरोबर तिने तिचा दुपट्टा अतिशय स्टायलिश पद्धतीने आणि ग्रेसने कॅरी केला.
-
तमन्नाने अँटिक गोल्ड मांग टीका आणि मॅचिंग कानातले घातले होते. केस सैल वेणीत बांधून, तिने हलक्या मेकअपसह आपला लूक पूर्ण केला होता.
-
चाहत्यांना तमन्ना भाटियाची एथनिक स्टाइल खूप आवडली. तिचे हे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
-
तमन्नाने घातलेला सुंदर लेहेंगा ‘तोरानी’चा डिझायनर लेहेंगा होता, त्याची किंमत सुमारे ३ लाख ८५ हजार रुपये आहे. हा लेहेंगा डिझायनरच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध असून त्याला ‘भद्रा नालिका लेहेंगा’ असे नाव देण्यात आले आहे.

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?