-
सध्या संपूर्ण सोशल मीडिया अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओंनी भरला आहे. या भव्य लग्नाची देशातच नाही तर जगभरात चर्चा होत आहे. अंबानी कुटुंबाच्या या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूडपासून राजकारण आणि क्रीडा जगतातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या लग्नाला परदेशातूनही लोक आले होते. (Photo Source: @usitaragattamaneni/instagram)
-
इतर स्टार्सप्रमाणे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेता महेश बाबू अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात पत्नी नम्रता शिरोडकर आणि मुलगी सितारा घट्टमनेनीसोबत पोहोचला होता. यादरम्यानचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महेश बाबूची लाडकी मुलगी सितारा आता खूप चर्चेत आली आहे. (Photo Source: @usitaragattamaneni/instagram)
-
दरम्यान, या लग्नात सिताराने अनेक सेलिब्रिटींसोबत फोटो काढले आहेत, तिने हे सर्व फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअरही केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की सिताराने बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्ससोबत या लग्नात खूप एन्जॉय केले. (Photo Source: @usitaragattamaneni/instagram)
-
सिताराने रेखा, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत फोटो क्लिक केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Source: @usitaragattamaneni/instagram)
-
या फोटोमध्ये सितारा ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनाससोबत पोज देताना दिसत आहे. (Photo Source: @usitaragattamaneni/instagram)
-
सिताराने रणवीर सिंगसोबत पॉट पोज देताना फोटो काढले. या फोटोत रणवीरही खूप आनंदी दिसत आहे. (Photo Source: @usitaragattamaneni/instagram)
-
या फोटोमध्ये अभिनेत्री रेखा आणि सितारा दिसत आहेत, अभिनेत्रीने सिताराला मिठी मारली आणि फोटो क्लिक केला. (Photo Source: @usitaragattamaneni/instagram)
-
या फोटोमध्ये सिताराा तिची आई नम्रता, बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. (Photo Source: @usitaragattamaneni/instagram)
-
बॉलिवूड सेलिब्रिटींशिवाय सिताराने हॉलिवूड स्टार किम कार्दशियनसोबतही अनेक फोटो क्लिक केले आहेत. किमने सितारासोबत पाउट बनवून पोज दिल्याचे हे छायाचित्र. (Photo Source: @usitaragattamaneni/instagram)
-
इतर सेलिब्रिटी मुलांप्रमाणेच महेश बाबूची मुलगी सिताराा नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, काही काळापूर्वी तिने एका ज्वेलरी ब्रँडसाठी ‘प्रिन्सेस’ नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले होते. (Photo Source: @usitaragattamaneni/instagram)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिताराने या शॉर्ट फिल्ममधून मिळालेले तिचे पहिले मानधन दान केले होते. या शॉर्ट फिल्ममधील अभिनयासाठी तिला एक कोटी रुपये मानधन मिळाले होते. याशिवाय सिताराने महेश बाबूसोबत ‘सरकारू वारी पाता’ या चित्रपटातील ‘पेनी’ या गाण्यातून तिचे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने ‘फ्रोझन २’ च्या तेलगु व्हर्जनमध्ये बेबी ‘एल्सा’ या पात्राला तिचा आवाजही दिला आहे. (Photo Source: @usitaragattamaneni/instagram)
(हे पण वाचा: PHOTOS : अनंत राधिकाला मोदींकडून मिळाली खास भेट, ‘या’ स्टार्सनीही दिला आशीर्वाद! )
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”