-
देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती एक निर्माती देखील आहे.
-
ती भारतातील भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिने दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.
-
१८ जुलै १९८२ रोजी जमदेशपूरमध्ये जन्मलेली ही अभिनेत्री तिचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
भारत सरकारने तिला पद्मश्री देऊन सन्मानित केलं आणि टाइम्सने तिला जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिलंय.
-
२०१८ मध्ये, फोर्ब्सच्या जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत प्रियांकाचा समावेश होता.
-
तिने द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय (२००३) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
प्रियांकाने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने फक्त बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
प्रियांकाचे इन्स्टाग्रामवर ९१ मिलियन फॉलोअर्स आहेत. ती सर्वाधिक फॉलोअर असलेली अभिनेत्री आहे.
-
आपल्या करिअरबरोबरच प्रियांका तिच्या लग्नामुळेही खूप चर्चेत राहिली.
-
चोप्राने २०१८ मध्ये अमेरिकन गायक आणि अभिनेता निक जोनासला डेट करायला सुरुवात केली. निकने तिला १९ जुलै २०१८ रोजी ग्रीसमध्ये प्रपोज केले होते.
-
नंतर अवघ्या सहा महिन्यात तिने निकशी लग्न केलं. डिसेंबर २०१८ मध्ये या जोडप्याने लग्न केले, जानेवारी २०२२ मध्ये या जोडप्याने सरोगसीद्वारे मुलगी मालतीचं स्वागत केलं.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांका कल्पना चावलाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे, हा चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”