-
गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर २’ (Dharmaveer 2) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
-
या चित्रपटाच्या लेखन व दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी निभावली आहे.
-
साहील मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई (Mangesh Desai) व झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी ‘धर्मवीर २’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
-
‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच (Dharmaveer 2 Trailer Launch) सोहळ्याला अभिनेत्री अमृता खानविलकरने हजेरी लावली होती.
-
साईप्रसाद केरकर यांनी या सोहळ्यातील अमृताचे (Amruta Khanvilkar) साडीतील खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी अमृताने गुलाबी रंगाची सिल्क बनारसी साडी (Pink Banarasi Silk Saree) नेसली होती.
-
बनारसी साडीतील लूकवर अमृताने सुंदर दागिन्यांचा साज केला होता.
-
या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे.
-
“हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही” अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.
-
‘धर्मवीर २’ चित्रपटात एकूण चार गाणी आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : गुलाबी डिझायनर साडीत सई ताम्हणकरच्या नखरेल अदा)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच