-
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिचं सौंदर्य आणखी बहरलं आहे. (सर्व फोटो सौजन्य-प्राजक्ता माळी, इंस्टाग्राम पेज)
-
प्राजक्ता माळी इंस्टाग्रामवर कायमच विविध फोटो पोस्ट करत असते. या फोटोंमध्ये तिचं सौंदर्य खुलतंच.
-
सिली हवा छू गयी….। असं खास कॅप्शन देत प्राजक्ताने हे फोटो पोस्ट केले आहेत.
-
प्राजक्ता माळीने आत्तापर्यंत विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
जुळून येती रेशीमगाठी ही प्राजक्ताची पहिली सीरियल होती. त्यानंतर तिने विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
प्राजक्ता माळीने पोस्ट केलेल्या या फोटोंवर चाहत्यांच्या अनेक कमेंट येत आहेत. तसंच या फोटोंना खूप लाईक्सही आले आहेत.
-
प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा या घराघरांत पोहचलेल्या शोचं अँकरींगही करते.
-
दागिन्यांचं खास कलेक्शन ती घेऊन आली आहे, ते दागिने घालूनच प्राजक्ताने हे फोटो काढले आहेत.
-
तुझं रुप पाहून मला ओम शांती ओम मधलं तुमको पाया है तो जैसे खोया हूँ.. हे गाणं आठवल्याचं एका चाहत्याने म्हटलं आहे.
-
एका चाहत्याने तर तिला हवी हवीशी नागीण असंही म्हटलं आहे. प्राजक्ताच्या फोटोंइतकीच या कमेंटचीही चर्चा होते आहे.
-
अभिनेत्री प्राजक्ता माळीने पोस्ट केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. काहींनी तर तिला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
-
प्राजक्ता माळीचा मोहक आणि लोभस लूक
-
प्राजक्ता माळीचा आणखी एक खास अंदाज चर्चेत.
