-
अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक सचिन पिळगांवकर तब्बल २० वर्षांनी ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.
-
चित्रपटाची घोषणा केल्यापासून दुसऱ्या भागात काय पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.
-
अखेर सचिन पिळगांवकरांनी याची पहिली झलक सर्वांबरोबर शेअर केली आहे.
-
दुसऱ्या भागात एसटीचा नव्हे तर कोकण रेल्वेचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.
-
‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात अशोक सराफ एसटीमधील बस कंडक्टरच्या भूमिकेत दिसले होते, आता दुसऱ्या भागात ते रेल्वे टीसीच्या भूमिकेत झळकणार असल्याचं त्यांचा लूक पाहून स्पष्ट झालं आहे.
-
याशिवाय ‘नवरा माझा नवसाचा 2’ मध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
-
अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, विजय पाटकर, जयवंत वाडकर, हरिश दुधाडे, गणेश पवार हे कलाकार चित्रपटात झळकणार आहेत.
-
‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची व निर्मितीची जबाबदारी अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी सांभाळली आहे.
-
हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : सचिन पिळगांवकर व नवरा माझा नवसाचा २ इन्स्टाग्राम पेज )
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”