-
साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्यांपैकी एक विजय सेतुपती सध्या त्याच्या ‘महाराजा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटगृहांनंतर आता हा चित्रपट ओटीटीवरही चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी केवळ २० कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने तब्बल ११३ कोटी रुपये कमावले. एवढेच नाही तर विजय सेतुपतीचे इतरही कमी बजेटचे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. (@विजय सेतुपती/एफबी)
-
पिझ्झा
२०१२ मध्ये, विजय सेतुपतीचा पिझ्झा हा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यासाठी फक्त दीड कोटी रुपये खर्च आला आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने सुमारे ८ कोटी रुपये कमावले. (IMDB) -
सुधू कव्वम
विजय सेतुपती याच्या ‘सुधू कव्वम’ चित्रपटाचे बजेट फक्त दोन कोटी रुपये होते आणि चित्रपटाने थिएटरमध्ये जबरदस्त कामगिरी करत तब्बल ३५ कोटी रुपये कमावले. हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता. (प्राइम व्हिडिओ) -
‘नाडुवुला कोंजाम पक्कथा कानोम
एका सत्य घटनेवर आधारित ‘नाडुवुला कोंजाम पक्कथा कानोम’ हा चित्रपट बनवण्यासाठी फक्त ८० लाख रुपये खर्च आला. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक कोटी ८० लाख रुपयांचे कलेक्शन केले होते. (प्राइम व्हिडिओ) -
‘धर्मा दुराई
२०१६ मध्ये रिलीज झालेल्या विजय सेतुपतीच्या ‘धर्मा दुराई’ चित्रपटाचे बजेट फक्त १३ कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिसवर जवळपास २६ कोटी रुपये कमावले होते. (हॉटस्टार) -
विक्रम वेधा
तमिळ चित्रपट विक्रम वेधाचे बजेट केवळ ११ कोटी रुपये होते आणि त्याने बॉक्स ऑफिसवर ६० कोटी रुपयांचे कलेक्शन केले. यात विजय सेतुपतीच्या कामगिरीचे खूप कौतुक झाले. (हॉटस्टार) -
‘इमाइका नोदियागल
विजय सेतुपती, नयनतारा आणि अनुराग कश्यप स्टारर ‘इमाइका नोदियागल’ हाही कमी बजेटचा चित्रपट होता. त्याचे बजेट १५ कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे ४० कोटी रुपये होते. (प्राइम व्हिडिओ) -
उप्पेना
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट ‘उप्पेना’चे बजेट १३- १५ कोटी रुपये होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८१- १०० कोटींची कमाई केली होती. (नेटफ्लिक्स)

Maharashtra Budget 2025 LIVE Updates: ‘लाडकी बहीण योजने’चे पैसे १५०० वरून वाढणार कधी? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…