-
भारताच्या माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या ग्लॅमरस आणि अनोख्या स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर निळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
-
या फोटो आणि व्हिडिओमध्ये सारा अगदी सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. तिने हा लेहेंगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नासाठी परिधान केला होता.
-
साराचा हा लेहेंगा डिझायनर सीमा गुजराल यांनी डिझाइन केला आहे. या लेहेंग्यात फ्लोरल एम्ब्रॉयडरी, क्रिस्टल्स, मोती आणि सिक्वेन्स वर्क केले आहे.
-
साराने फ्लेर्ड ए-लाइन स्कर्ट मोत्याच्या टॅसेल्ससह स्ट्रॅपी ब्लाउजसह पेअर केले. साराने या ड्रेससोबत नेट एम्ब्रॉयडरी मॅचिंग दुपट्टा कॅरी केला.
-
ड्रेससोबतच साराने पर्ल क्लच, डायमंड चोकर, ड्रॉप इअररिंग्स, अंगठी आणि ब्रेसलेटचे परिधान केले आहे. तिचा लुक पूर्ण करण्यासाठी तिने ग्लॉसी मेकअप केला आहे.
-
साराच्या हेअरस्टाइलबद्दल सांगायचे तर, साराने तिच्या केसांमध्ये फ्लोरल ॲक्सेसरीज घातल्या आहेत. तिचा हा लूक खूपच सुंदर आणि क्यूट दिसत आहे.
-
साराच्या या ड्रेसबद्दल सांगायचे तर या लेहेंग्याची किंमत तब्बल २ लाख ४८ हजार रुपये सांगण्यात आली आहे.

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य