-
कोरिओग्राफर-दिग्दर्शक फराह खानला मातृशोक झाला आहे.
-
फराह खान आणि साजिद खान यांच्या आई मेनका इराणी यांचे शुक्रवारी (२६ जुलै रोजी) मुंबईत निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या आणि बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या.
-
त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना डिस्चार्ज दिल्यावर घरी आणलं होतं, पण नंतर प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले.
-
काही दिवसांपूर्वीच फराह खानने तिच्या आईचा ७९ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त फराह खानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आणि तिच्या नावाने एक भावनिक पोस्टही लिहिली होती.
-
फराहने पोस्टमध्ये लिहिले होते की, “माझ्या आई मेनकावर माझे किती प्रेम आहे, हे गेल्या महिन्यातच मला समजले. मी तिच्यासारखी धाडसी आणि खंबीर व्यक्ती कधीच पाहिली नाही.”
-
फराहने १२ जुलै रोजी ही पोस्ट केली होती. त्यानंतर दोन आठवड्यात फराहच्या आईचे निधन झाले आहे.
-
मेनका इराणी या बालकलाकार डेजी इराणी आणि हनी इराणी यांच्या बहीण होत्या. त्यांनी ‘बचपन’ (१९६३) चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम केले होते. या चित्रपटात सलमान खानचे वडील आणि पटकथा लेखक सलीम खान देखील होते.
-
मेनका इराणी या फरहान अख्तर व झोया अख्तरची मावशी होत्या.
-
(सर्व फोटो – फराह खान इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”