-
बहुचर्चित ‘धर्मवीर २’ (Dharmaveer 2) या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे.
-
९ ऑगस्टला ‘धर्मवीर २’ चित्रपट जगभरात मराठी व हिंदी भाषेत प्रदर्शित होणार होता.
-
मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे (Maharashtra Floods) चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
-
‘धर्मवीर २’ चित्रपटाचा टीजर, गाणी आणि ट्रेलरला सोशल मीडियातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
-
त्यामुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई (Mangesh Desai) म्हणाले, की गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूर जन्य परिस्थिती निर्माण झाली आहेत.
-
काही गाव पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे.
-
राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहता ‘धर्मवीर – २’ हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही.
-
महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना, त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी असताना त्याच काळात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू असे सांगितले.
-
(सर्व फोटो सौजन्य : मंगेश देसाई/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”