-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता पृथ्वीक प्रताप घराघरांत लोकप्रिय झाला.
-
सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करून पृथ्वीकने आज यशाचा एवढा मोठा टप्पा गाठला आहे.
-
पृथ्वीक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो.
-
काही दिवसांपूर्वीच पृथ्वीकने हक्काचं घर खरेदी केलं होतं.
-
आधी घर अन् आता पहिली गाडी घेत पृथ्वीकने आपली स्वप्नपूर्ती केली आहे.
-
नव्या गाडीचे फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
गाडी घेताना अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.
-
“पाहिलेल्या स्वप्नांची यादी पूर्ण करण्याच्या प्रवासाला थोडी गती मिळावी म्हणून संयमाची चार चाके जोडतोय. आशीर्वाद आणि प्रेम असू द्या.” असं कॅप्शन देत पृथ्वीकने त्याच्या नव्या गाडीचे फोटो शेअर केले आहेत.
-
सोशल मीडियावर सर्वच कलाकार मंडळींनी पृथ्वीकवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : पृथ्वीक प्रताप )
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”