-
अजय देवगणच्या ‘शैतान’ या चित्रपटातील आपल्या नकारात्मक भूमिकेने लोकांची मने जिंकणारा अभिनेता आर माधवनने नुकतेच मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी येथे एक आलिशान घर खरेदी केले आहे.
-
आर माधवनचे हे नवीन घर ३८९ स्क्वेअर मीटर म्हणजेच ४१८२ स्क्वेअर फूट आहे. ४ बेडरूम आणि मोठ्या पार्किंगसह हा एक आलिशान अपार्टमेंट आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे एक रेडी-टू-शिफ्ट अपार्टमेंट आहे ज्याचा डील २२ जुलै रोजी फायनल झाली होती.
-
हे आलिशान अपार्टमेंट सिग्निया पर्ल येथे आहे आणि यामध्ये अनेक दर्जाच्या विविध सुविधा देखील आहेत.
-
अभिनेत्याने या आलिशान अपार्टमेंटसाठी तब्बल १.०५ कोटी आणि ३० हजार रुपयांची मुद्रांक शुल्काची रक्कम भरली आहे.
-
स्क्वेअर यार्ड वेबसाइटनुसार आर माधवनच्या या नवीन घराची किंमत १७.५ कोटी रुपये आहे.
-
आर माधवनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास ‘दे दे प्यार दे-२’ आणि दिग्दर्शक आदित्य धार यांचा नवीन चित्रपटात आर माधवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”