-
बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर या स्टार्सनी आज जे स्थान मिळवले आहे ते गाठणे हे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते. हे कलाकार आपल्या प्रसिद्धीतून प्रेरणा देतात की, पूर्ण झोकून देऊन मेहनत केली तर यश एक दिवस नक्कीच मिळते.
-
आज आपण त्या स्टार्सबद्दल जाणून घेणार आहोत जे आज आलिशान जीवन जगत आहेत आणि आलिशान बंगल्यांमध्ये राहत आहेत, परंतु संघर्षाच्या दिवसांमध्ये ते चाळींमध्येही राहत होते.
-
अर्शद वारसी
मुन्नाभाई एमबीबीएस, गोलमाल, धमाल, इश्किया आणि जॉली एलएलबी यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेल्या अर्शद वारसीनेही मुंबईच्या चाळीत दिवस काढले आहेत. त्यांचे बालपण चाळीतच गेले. (फोटो स्रोत: अर्शद वारसी/इन्स्टाग्राम) -
गोविंदा
‘पार्टनर’, ‘जोडी नंबर 1’, ‘हसीना मान जायेगी’, ‘अनाडी नंबर 1’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘दुल्हे राजा’, ‘कुली नंबर 1’, ‘आँखे’ आणि यांसारख्या अनेक हिट चित्रपटात दिसलेला बॉलीवूड अभिनेता गोविंदाही पूर्वी चाळीत राहत होता. त्याने आयुष्यातील २० वर्षे गिरगावच्या श्याम सदन चाळीत घालवली आहेत. (फोटो स्रोत: गोविंदा/इन्स्टाग्राम) -
अनुपम खेर
‘द काश्मीर फाइल्स’, ‘स्पेशल छब्बीस’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले अनुपम खेरही संघर्षाच्या दिवसात चाळीत राहत असत. (फोटो स्रोत: अनुपम खेर/इन्स्टाग्राम) -
जितेंद्र
‘तोहफा’, ‘धरमवीर’, ‘ठाणेदार’, ‘हिम्मतवाला’ यांसारख्या दिमाखदार चित्रपटांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनीही चाळीत वास्तव्य केले आहे. जितेंद्र यांचे कुटुंब पंजाबमधील अमृतसर येथून आले आणि मुंबईतील गिरगाव येथील ‘श्याम सदन चाळ’मध्ये स्थायिक झाले. या चाळीत जितेंद्रने जवळपास 20 वर्षे कुटुंबासोबत घालवली होती. (फोटो स्रोत: जितेंद्र/इन्स्टाग्राम) -
मनोज बाजपेयी
‘द फॅमिली मॅन’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘गुलमोहर’, ‘सत्या’ आणि ‘शूल’ यांसारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलेले मनोज बाजपेयी करिअरच्या सुरुवातीच्या काळात चाळीत राहत होते. (फोटो स्रोत: मनोज बाजपेयी/इन्स्टाग्राम) -
जॅकी श्रॉफ
‘रंगीला’, ‘बंधन’ आणि ‘खलनायक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेले ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ आपल्या करिअरमध्ये यशस्वी होण्यापूर्वी दक्षिण मुंबईतील ग्रँट रोडजवळील तीन बत्ती चाळमध्ये राहत होते. त्यांनी आपल्या आयुष्याची ३३ वर्षे चाळीत घालवली आहेत. (फोटो स्रोत: जॅकी श्रॉफ/इन्स्टाग्राम) -
शेफाली शहा
वेब सीरिज ‘दिल्ली क्राइम 2’ आणि आलिया भट्टच्या ‘डार्लिंग्स’ या चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकणारी शेफाली शाह तिच्या कुटुंबासह फिशरमन कॉलनीतील एका चाळीत बराच काळ राहत होती. (फोटो स्रोत: शेफाली शाह/इन्स्टाग्राम) -
विकी कौशल
‘साम बहादूर’, ‘जरा हटके जरा बचके’, ‘उरी’ आणि ‘राझी’ यांसारख्या दमदार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारा अभिनेता विकी कौशलही आपल्या कुटुंबासह मुंबईत एका छोट्याशा चाळीत राहत होता. (फोटो स्रोत: विकी कौशल/इन्स्टाग्राम) -
जॉनी लीव्हर
उत्कृष्ट कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या जॉनी लीव्हरने बऱ्याच संघर्षानंतर अभिनय क्षेत्रात करिअर केले. त्यांचे बालपण मुंबईतील चाळीत गेले. जॉनी लीव्हर यांनी ‘मैं खिलाडी तू अनारी’, ‘करण अर्जुन’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘जुदाई’, ‘येस बॉस’, ‘दीवाना मस्ताना’ आणि ‘दुल्हे राजा’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो स्त्रोत: जॉनी लीव्हर/इन्स्टाग्राम) -
श्वेता तिवारी
आपल्या दमदार अभिनयाने आणि मेहनतीने टीव्ही इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री श्वेता तिवारीही तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या प्रवासात एका चाळीत राहिली. (फोटो स्रोत: श्वेता तिवारी/इन्स्टाग्राम)
Crime News : पुण्यात चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना पोलिसांनी केली अटक