-
मानसी नाईक ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.
-
आपल्या अभिनयाबरोबरच डान्समुळेही तिला ओळख मिळाली.
-
‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांनी मानसीला खूप लोकप्रियता मिळवून दिली.
-
मानसी आपल्या सुंदर लूकमुळेही चर्चेत असते.
-
मानसीने नुकतेच पारंपरिक मराठी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
-
मानसीने या फोटोंबरोबर दिलेल्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतले आहे.
-
आपल्याला काहीतरी मिळत आहे असे म्हणून कोणत्याही गोष्टीवर सेटल होणाऱ्या लोकांच्या या जगात सिंगल राहण्यासाठी खूप धाडस असावे लागते. – मानसी नाईक
-
आयुष्यात, Prayer (प्रार्थना), Priorities (प्राधान्यक्रम), Peace(शांतता), Positivity (सकारात्मकता), Patience (संयम) या ‘P’ वर ठाम राहा.- मानसी नाईक
-
जोपर्यंत तुम्हाला साजेसं कोणी भेटत नाही तोपर्यंत सिंगल राहा, सेटल होऊ नका. – मानसी नाईक
-
प्रेमाची आशा ठेवा, प्रेमासाठी प्रार्थना करा, प्रेमाची स्वप्ने पाहा, पण प्रेमाची वाट पाहण्यात तुमचं आयुष्य थांबवू नका.- मानसी नाईक
-
चुकीच्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा सिंगल राहणं कधीही चांगलं आहे. – मानसी नाईक
-
या वर्षी मी हरले, जिंकले, अपयशी झाले, रडले, हसले, प्रेम केले, पण मी झुकले नाही. कणखर स्त्रिया कधीही हार मानत नाहीत.- मानसी नाईक
-
आपल्याला कदाचित कॉफी घ्यावी वाटेल, थोडं रडावं वाटेल किंवा एखादा दिवस काहीच काम न करता अंथरुणात घालवावा वाटेल. मात्र, यानंतर कणखर स्त्रिया आणखी सशक्त होऊन परततात.- मानसी नाईक
-
मी मला झालेला त्रास एखाद्या देवीप्रमाणे सहन केल्या. मी कधीही मागे वळून पाहत नाही, मी कधीही हार मानणार नाही… कधीही नाही. चीयर्स टू बीइंग मी,” असं कॅप्शन मानसीने फोटोंना दिलं आहे.- मानसी नाईक
-
मानसीची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. (फोटो- मानसी नाईक इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख