-
बॉलीवूडमध्ये ‘बाबा’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता संजय दत्त ६५ वर्षांचा झाला आहे. (फोटो – डब्बू रत्नानी इन्स्टाग्राम)
-
बॉलीवूडचे दिवंगत अभिनेते सुनील दत्त व नर्गिस यांचा मुलगा संजय दत्त याने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत.
-
१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात संजय दत्तचे नाव आले होते ज्यासाठी त्याला ५ वर्षांची शिक्षा झाली होती.
-
यानंतर २०२० मध्ये वयाच्या ६१ व्या वर्षी त्याला फुफ्फुसाच्या कर्करोगाचे (चौथा टप्पा) निदान झाले. पण त्याने कर्करोगावर मात केली.
-
संजय दत्त दोन गोष्टींशिवाय करू शकत नाही. यासोबतच त्यांचा एक छंद होता जो पूर्ण करण्यासाठी ते भोपाळ आणि लखनऊला जात असे.
-
संजय दत्तचा मित्र रशीद हकीम यांच्या मते, संजय त्याच्या आयुष्यात दोन गोष्टींशिवाय राहू शकत नाही: पहिलं म्हणजे कुटुंब आणि दुसरं म्हणजे व्यायाम (वर्कआउट). आयुष्यात
-
आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिल्यानंतर तो आपल्या कुटुंबाच्या खूप जवळ आला आहे. संजय दत्त म्हणतो की त्याच्या आयुष्यात पत्नी आणि मुलांशिवाय काहीच नाही. यासोबतच तो वर्कआउटशिवाय राहू शकत नाही.
-
अभिनेते रझा मुराद यांनी संजयबरोबर खूप सिनेमे केले आहेत. ते सांगतात की, संजय दत्त सेटवर खूप निवांत असायचा. तो आपले काम हसत-खेळत करायचा. संजय दत्तने आपल्या आयुष्यात किती चढ-उतारांचा सामना केला, याची जाणीव कोणालाही होऊ दिली नाही.
-
रझा मुराद यांच्या म्हणण्यानुसार, संजय दत्तला बंदुका आणि शिकारीची खूप आवड होती. हा अभिनेता अनेकदा भोपाळ आणि लखनऊला शिकारीसाठी जात असे.
-
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते रझा मुराद यांनी संजय दत्तबरोबर ‘मेरा हक’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केले होते.
-
यानंतर त्यांनी ‘इनाम १० हजार’, ‘कानून अपना अपना’, ‘सफारी’, ‘सरहद पार’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
-
(सर्व फोटो – संजय दत्त इन्स्टाग्राम)

09 April Horoscope: अचानक लाभ अन् मौल्यवान वस्तूंची खरेदी, कोणत्या राशीच्या नशिबात कसे येईल सुख? वाचा बुधवारचे राशिभविष्य