-
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नाव आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी अभिनेत्रीने खूप मेहनत घेतली आहे. सुरुवातीला शर्वरीला अनेक नकारांचा सामना करावा लागला. आज ती तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याने आणि स्टाईलने चाहत्यांचे मन जिंकले आहे. आता ती पुन्हा तिच्या फिटनेसमुळे चर्चेत आली आहे.
-
शर्वरी वाघने नुकतीच ‘मुंज्या’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. यामध्ये तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले. या हिट चित्रपटानंतर शर्वरीने यश राज फिल्म्सच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
-
या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर शर्वरी ‘अल्फा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिनेत्री यासाठी खास फिटनेसचे प्रशिक्षण घेत आहे. शर्वरीने याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्री जिम आउटफिटमध्ये दिसत आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्टही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
शर्वरी वाघच्या या फोटोंमध्ये तिला वर्कआऊट करताना पाहून हा अंदाज लावला जाऊ शकतो की ती यासाठी खूप मेहनत घेतल आहे.
-
व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये शर्वरी सिक्स पॅक ॲब्ससोबतही दिसत आहे. तिच्या वर्कआऊटमध्ये ती बॉक्सिंग करतानाही दिसली. या चित्रपटात शर्वरी ॲक्शन सीन करताना दिसणार आहे. तिला या नव्या अवतारात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
-
यश राज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा या चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ सुपर एजंटच्या भूमिकेत दिसणार आहेत.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव रवैल करत आहेत. याआधी त्यांनी ‘द रेलवे मेन’ ही मालिका दिग्दर्शित केली होती.
-
(फोटो- शर्वरी वाघ/इन्स्टाग्राम)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा