-
बॉलीवूडचा दबंग हीरो सलमान खानचा देशातच नाही तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. सलमान अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो.
-
मोठी संपत्ती असलेल्या सलमान खानला चैनीच्या वस्तूंचा शौक आहे. त्याच्याकडे अशा अनेक महागड्या वस्तू आहेत ज्यांची किंमत ऐकून आपण आश्चर्यचकित होऊ. (इंडियन एक्सप्रेस)
-
सध्या सलमान खान त्याने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात घातलेल्या घड्याळामुळे चर्चेत आहे. या घड्याळाची किंमतच नाही तर तिची डिझाइनही तितकीच खास आहे. (इंडियन एक्सप्रेस)
-
सलमान खानने घातलेल्या किंमत इतकी आहे की नोएडा सारख्या शहरात आपण सहा 2 BHK फ्लॅट खरेदी करू शकतो. (@jacobandco/Insta)
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात सलमान खान लक्झरी घड्याळ निर्मिती कंपनी ‘जेकब अँड कंपनी’चे घड्याळ घातलेला दिसला.
-
सदर कंपनीने सोशल मीडियावर या संबंधीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. एका छायाचित्रात सलमानसह ‘जेकब अँड को’ घड्याळेचे संस्थापक आणि अध्यक्ष जेकब आर्बोही दिसत आहेत.(@jacobandco/Insta)
-
सलमान खानचे हे घड्याळ बुगाटीच्या W16 इंजिनप्रमाणे डिझाइन करण्यात आले असून ते कारच्या मोटर इंजिनप्रमाणेच काम करते. हे घड्याळ एखाद्या हायपरकारसारखे चालते. (@jacobandco/Insta)
-
सलमान खानने रोझ गोल्ड कलरचे घड्याळ घातले आहे ज्यामध्ये ओपनवर्क रबरचा पट्टा आहे. (@jacobandco/Insta)
-
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या घड्याळाची किंमत सुमारे 3 कोटी 26 लाख रुपये आहे. (@jacobandco/Insta)

डोनाल्ड ट्रम्प ९० दिवसांसाठी आयात शुल्कापासून दिलासा देणार? व्हाइट हाऊसचं स्पष्टीकरण…