-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ (Chotya Bayochi Mothi Swapna) या मालिकेने आता ६०० भागांचा टप्पा पार केला आहे.
-
बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी ही मालिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे.
-
शिक्षणाच्या ध्यासाने कोकण ते मुंबई असा खडतर प्रवास करणारी बयो आता डॉक्टर होण्याच्या प्रवासात पुढची वाटचाल करते आहे.
-
मुंबईसारख्या स्वप्नांच्या नगरीत येऊन आपले स्वप्न पूर्ण करू पाहणारी बयो अनेक संकटांना सामोरी गेली आहे.
-
या मालिकेत ‘बयो’ची भूमिका अभिनेत्री विजया बाबर चोख बजावते आहे.
-
६००वा भाग साजरा करण्यासाठी मालिकेतील सगळे कलाकार उपस्थित होते.
-
यावेळी अभिनेत्री विजया बाबर म्हणाली.. हा ६०० भागांचा टप्पा प्रेक्षकांच्या प्रेमाशिवाय पूर्ण करू शकलो नसतो.
-
प्रेक्षकांचे प्रेम जर असेच पाठीशी राहिले तर आम्ही अजून जोमाने काम करू.
-
मालिकेच्या संपूर्ण चमूने एकत्र येऊन हा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा केला आणि आनंद व्यक्त केला.
-
आजवरचा बयोचा प्रवास खडतर होता, पण यापुढला तिचा प्रवास कसा असेल, हे मालिकेतल्या पुढल्या भागांत पाहायला मिळेल.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनी मराठी/इन्स्टाग्राम)

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”