-
अभिनेत्री सना मकबूल बिग बॉस ओटीटी 3 ची विजेती ठरली असून तिला चमकदार ट्रॉफीसह २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. मात्र सना मकबूलचे आयुष्य वाटते तितके सोपे नाही.
-
सना मकबूलच्या आयुष्यात एक वेदनादायक अपघात घडला होता ज्यामुळे ती नऊ महिने डिप्रेशनमध्ये गेली. तिच्या ओठांवर १२१ टाके घालण्यात आले. आजही तो अपघात आठवला की तिच्या डोळ्यात पाणी येते.
-
शिक्षण
१३ जून १९९३ रोजी मुंबईत जन्मलेल्या सना मकबूलने मुंबई पब्लिक स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने मुंबईच्या नॅशनल कॉलेजमधून पदवी घेतली. -
सना मकबूलने बिग बॉसच्या घरातच खुलासा केला होता की, तिला एकदा कुत्रा चावला होता, त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रियेची जखम अजूनही आहे.
-
सना मकबूलच्या म्हणण्यानुसार, या शस्त्रक्रियेमुळे तिची अवस्था बिघडली होती. तिने शोमध्ये खुलासा केला होता की, या अपघातामुळे ती आतून इतकी तुटून गेली होती की ती नऊ महिने डिप्रेशनमध्ये गेली.
-
कुत्र्याने सना मकबूलच्या ओठांवर चावा घेतला होता. तिच्या चेहऱ्यावर ओठांच्या अगदी वर सुमारे १२१ जखमा आहेत. जेव्हा तिने हे सांगितले तेव्हा रणवीर शौरी देखील आश्चर्यचकित झाला.
-
वास्तविक, एका टास्कदरम्यान त्याने सनाच्या ओठांची खिल्ली उडवली होती. मात्र, नंतर जेव्हा त्याला कळाले तेव्हा रणवीरने सनाची माफीही मागितली.
-
सनाला एका बीगल कुत्र्याने चावा घेतला होता. हा वाईट अनुभव विसरायला अभिनेत्रीला नऊ महिने लागले. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना साथ दिली. शस्त्रक्रियेनंतरही सना मकबूलच्या चेहऱ्यावर एक डाग कायम होता.
-
सना मकबूलने 2009 मध्ये एमटीव्हीच्या रिॲलिटी शो ‘स्कूटी टीन दिवा’मधून अभिनयाच्या जगात प्रवेश केला. यानंतर ती ‘ईशान : सपनो को आवाज दे’, ‘कितनी मोहब्बत है 2’, ‘इस प्यार को क्या नाम दूं’ आणि ‘अर्जुन’ सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. याशिवाय सना २०२१ मध्ये ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी’मध्येही दिसली.
-
सना मकबूलने ‘डिक्कुलु चूडाकू रामय्या’, ‘रंगून’ आणि ‘मामा ओ चंदामामा’ यांसारख्या साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे. याशिवाय सनाने अनेक म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले आहे. (फोटो: सना मकबुल/इन्स्टाग्राम)
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”