-
टीव्हीपासून सुरुवात करून बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकुर होय.
-
मृणाल ठाकुर चित्रपट व जाहिरातीतून लाखो रुपये कमावते.
-
पण ती स्वतःवर जास्त पैसे खर्च करत नाही. तिला त्या पैशांची बचत करून शेती करायची आहे. मृणाल कपड्यांवरही जास्त पैसेही खर्च करत नाही, असं तिने स्वतःच सांगितलं आहे.
-
सध्या मृणाल ठाकुर ‘कल्की 2898 एडी’ मधील तिच्या कॅमिओमुळे चर्चेत आहे. तिचा ‘हाय पापा’ सिनेमाही खूप गाजला.
-
‘गलाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत मृणाल म्हणाली, “मला शेती करायची आहे.”
-
ती शेतीसाठी अभिनय सोडणार नसल्याचं मृणालने स्पष्ट केलं. पण तिला शेतातल्या कामात स्वतःला गुंतवायचं आहे, तसेच तिने जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ती पैशांची बचत करत आहे.
-
‘सीता रामम’ फेम मृणाल ठाकूरने सांगितलं की ती कपड्यांवरही जास्त पैसे खर्च करत नाही. कपड्यांवर जास्त पैसे का खर्च करायचे, असं ती म्हणते. ती जे कपडे घालते ते सर्व आउटसोर्स केलेले असतात, असंही तिने सांगितलं.
-
इतकंच नाही तर ‘हाय पापा’ फेम अभिनेत्रीच्या मते तिने कोणत्याच कपड्यांवर जास्त पैसे खर्च केले नाहीत. ती जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचे कपडे घेते, तेवढे पैसेही तिला जास्त वाढतात. महागड्या कपड्यांवर पैसे खर्च करणं अर्धहीन असल्याचं ती म्हणते.
-
मृणाल म्हणते की महागडे कपडे खरेदी करणे चुकीचे आहे कारण ते पुन्हा पुन्हा घालता येत नाही. ब्रँडेड कपडे खरेदी करण्याऐवजी मी पैसे बचत करून जमीन घेईन, जिथे शेती करता येईल. तसेच राहण्यासाठी घर घेईन असं मृणाल सांगते.
-
मृणाल म्हणते की तिला त्या जमिनीवर भाजीपाला किंवा फळं पिकवायची आहेत, जी ती खाऊ शकते.
-
ती खूप दिवसांपासून शेती विकत घेण्याची तयारी करत आहे. त्यासाठी ती पैशांची बचत करत आहे, असंही तिने सांगितलं. वाचवत आहे.
-
जवळपास ३३ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण असलेली मृणाल ठाकुर आघाडीची अभिनेत्री आहे. पण तरीही ती महागडे कपडे खरेदी करण्याचे समर्थन करत नाही.
-
(फोटो – मृणाल ठाकुरच्या इन्स्टाग्रामवरून साभार)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख