-
गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूरजन्य (Maharashtra Floods) परिस्थिती निर्माण झाली होती. (Express Photo By Pavan Khengre)
-
काही गाव पाण्याखाली गेली तर काही गावांचा संपर्कही तुटला होता. (Express Photo By Pavan Khengre)
-
राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहून ‘धर्मवीर २’ (Dharmaveer 2) या ९ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची तारीख (Release Date) पुढे ढकलण्याचा निर्णय हा चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई (Mangesh Desai) आणि उमेश कुमार बन्सल (Umesh Kr Bansal) यांनी घेतला.
-
या अनोख्या निर्णयाचे सगळीकडे विशेष कौतुकही करण्यात आले होते.
-
सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात असून अजून दीड महिन्याचा अवधी घेऊन येत्या २७ सप्टेंबरला (27 September 2024) ‘धर्मवीर २’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे.
-
या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली.
-
प्रदर्शनाची तारीख पुढे गेल्यावर चित्रपटगृहांकडून विचारणा होत होती ,अनेक ग्रुप बुकिंगसाठी थांबलेले होते, परदेशातून प्रदर्शनासाठी विचारणा होत होती, सोशल मीडियावरही चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याची विचारणा अनेकजण करत होते.
-
आता प्रेक्षकांना चित्रपटासाठी केवळ २७ सप्टेंबर पर्यंत अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.
-
‘धर्मवीर २’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मंगेश देसाई/इन्स्टाग्राम)

Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज