-
बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक हीट चित्रपट केले आहेत. यापैकी अनेक कलाकारांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे. जाणून घेऊया बॉलीवूडमधील या कलाकारांबद्दल.
-
अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या ‘ब्लॅक’ चित्रपटात रणबिर कपूर सहाय्यक दिग्दर्शक होता.
-
अर्जुन कपूर हा बॉलीवुड ब्लॉकबस्टर ‘कल हो ना हो’ आणि ‘सलाम-ए-इश्क’ मध्ये सहाय्यक दिग्दर्शक होता.
-
शाहरुख खान आणि काजोल यांचा ‘माय नेम इज खान’ या चित्रपटातून वरुण धवनने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.
-
बॉलीवूड अभिनेता संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूरने २०२० च्या ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
-
बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर याने ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
-
ईशान खट्टरने ‘उडता पंजाब’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
-
सोनम कपूरनेही बॉलीवूडमध्ये आपल्या कारकीर्दीची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. सोनम रणबीर कपूरसोबत ‘ब्लॅक’ चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शक होती.
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”